Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • महामार्ग बायपासचा अट्टाहास अखेर नडला!
    • प्रवास ग्रंथालयांचा : माहिती संग्रहालय ते आधुनिक ग्रंथालय!
    • ‘डॉल्फिन’ आणि ‘चान-होम’ चक्रीवादळांमुळे भारताला धोका
    • अशी तशी नव्हे; चक्क बसचीच केली चोरी!
    • बापरे! भटक्या श्वानाचा कहर; १३० जणांना चावला!
    • ए.आर. रहमानच्या मुलाचा मध्यरात्री भीषण अपघात
    • फुटलेल्या सहा खासदारांमध्ये चलबिचल वाढली
    • संघर्ष पेटला : झारखंडमध्ये जंतरमंतरसारखी पुनरावृत्ती
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»‘ड्रॉप केस’च्या साम्राज्यावर सर्जिकल स्ट्राइक!
    गुन्हे वार्ता

    ‘ड्रॉप केस’च्या साम्राज्यावर सर्जिकल स्ट्राइक!

    मुक्ताईनगरातील पाच गावांवर पहाटे ऑपरेशन : रोकड, दागिने, गावठी कट्टे जप्त
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 19, 2026No Comments305 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    मुक्ताईनगर

    ‘ड्रॉप केस’साठी कुप्रसिद्ध असलेल्या मुक्ताईनगर तालुक्यातील लालगोटा, हलखेडा, मधापुरी, जोंधनखेडा आणि चारठाणा या गावांवर जळगाव पोलिसांनी शुक्रवारी पहाटे अभूतपूर्व धाडसत्र राबवत ‘ऑपरेशन ड्रॉप केस’ हे विशेष अभियान यशस्वी केले. जिल्हा पोलीस दलाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या आणि नियोजनबद्ध मोहिमांपैकी एक मानल्या जाणाऱ्या या कारवाईत शेकडो पोलिसांनी एकाचवेळी गावांमध्ये प्रवेश करून संशयित व सराईत गुन्हेगारांवर कारवाई केली.

    मुक्ताईनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही गावे अनेक वर्षांपासून फसवणूक, दरोडे आणि लुटमारीच्या गुन्ह्यांसाठी चर्चेत आहेत. अल्प लोकसंख्या असूनही सोशल मीडियावर काळी हळद, नागमणी, रेड मर्क्युरी, सफेद बिबा, उलटी वासन, सुलेमानी पत्थर, सेकंड करन्सी, ॲल्युमिनियम भंगार, जुने सोने, कॉपर, शंख व डबल इंजिन या सारख्या कथित दुर्मिळ वस्तूंचे व्हिडिओ व्हायरल करून मोठ्या नफ्याचे आमिष दाखवले जात असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या व्हिडिओंना भुलून गावात येणाऱ्या नागरिकांना बनावट वस्तू दाखवून लाखो रुपयांची फसवणूक केली जाते. अनेकांना थेट लुटले जाते तर विरोध करणाऱ्यांना मारहाण केली जाते. काही प्रकरणांमध्ये पीडितांच्या जवळ हरणाचे किंवा वाघाचे बनावट कातडे ठेवून त्यांचे व्हिडिओ तयार केले जातात आणि वन्यजीव तस्करीच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत तक्रार करण्यापासून परावृत्त केले जाते. या संपूर्ण प्रकाराला पोलिसांच्या भाषेत ‘ड्रॉप केस’ म्हटले जाते.

    मागील तीन वर्षांत या परिसरात 10 दरोडे, 1 खुनासह दरोडा, 1 खून, 7 जबरी चोरी, 16 फसवणुकीचे गुन्हे, 1 दरोड्याचा प्रयत्न आणि 2 सरकारी नोकरांवरील हल्ल्यांचे गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे या भागाकडे पोलिसांचे विशेष लक्ष होते. या कारवाईदरम्यान फरेज राजू पवार, रामजाने राईसाहेब भोसले, आक्काबाई जोगिंदर भोसले, रोहित सुदेश पवार यांच्यासह विविध आरोपींविरुद्ध शस्त्र अधिनियम, महाराष्ट्र पोलीस अधिनियम, भारतीय न्याय संहिता तसेच वन्यजीव संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच विलास नरविलाल पवार व अजय दादा पवार या पाहिजे आरोपींनाही अटक करण्यात आली.

    मोठा मुद्देमाल जप्त

    या कारवाईत एकूण 20 लाख रुपयांची रोकड, अंदाजे 30 लाख रुपयांचे 300 ग्रॅम सोन्याचे दागिने, 8 लाख रुपयांचे 4 किलो चांदीचे दागिने, दोन गावठी कट्टे, तीन जिवंत काडतुसे, हरणाचे, कोल्ह्याचे व सशाचे कातडे, चार चारचाकी वाहने, सहा दुचाकी वाहने आणि 30 मोबाईल फोन जप्त करण्यात आले. याशिवाय संशयास्पद स्वरूपाचा इतर मुद्देमालही पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

    200 पोलिसांचा सहभाग

    पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी तथा मुक्ताईनगरचे प्रभारी केदार बारबोले, परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत दरेकर, पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, महेश गायकवाड, निलेश गायकवाड, राहुल वाघ, आशिष लव्हांगळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील, योगिता नारखेडे, मीरा देशमुख, अमितकुमार बागुल यांच्यासह सुमारे 200 पोलीस अधिकारी व अंमलदार सहभागी झाले होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    अशी तशी नव्हे; चक्क बसचीच केली चोरी!

    August 10, 2026

    धानोऱ्यातील शेतकऱ्याच्या खात्यावर सायबर डल्ला!

    August 9, 2026

    विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

    August 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif