राष्ट्रवादी शरद पवार गटाला धक्का

पदाधिकाऱ्यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश

0

 

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत हिरापूर येथील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी उपसरपंच व माजी विकासो चेअरमन विजय निकुंभ (गोटू पैलवान), तसेच माजी ग्रा.पं. सदस्य दीपक देवरे व सहकाऱ्यांनी आज भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर पाटील, माजी पंचायत समिती सभापती विजय जाधव, हिरापूर गावाचे लोकनियुक्त सरपंच भैय्यासाहेब पाटील, राजेंद्र मांडे आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.