Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिल्लीतील इमारत कोसळली; किती विद्यार्थी दबले गेले?
    • यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला
    • यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?
    • भुसावळ राष्ट्रवादीचे ११ नगरसेवक शिवसेनेत; सावकारे गटात अस्वस्थता!
    • बापरे! मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोटाने खळबळ!
    • दिल्लीत 5 मजली इमारत कोसळली
    • महाराष्ट्रातील ‘या’ भागांमध्ये पावसाचा इशारा
    • नव्या टीमनंतर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»अपघात»ए.आर. रहमानच्या मुलाचा मध्यरात्री भीषण अपघात
    अपघात

    ए.आर. रहमानच्या मुलाचा मध्यरात्री भीषण अपघात

    भरधाव पोर्शे कारची रॅपिडो वॅगन-आरला धडक
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveAugust 10, 2026No Comments423 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    मनोरंजन सृष्टीतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमानचा मुलगा आणि गायक आणि संगीत निर्माता ए.आर. अमीन याचा चेन्नईमध्ये रोड एक्सिडेंट झाला. सुदैवाने या अपघातात अमीनला केवळ किरकोळ दुखापत झाली असून, रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, चेन्नईच्या गिंडी परिसरात पहाटे साडेतीनच्या सुमारास हा अपघात झाला. अमीन आपल्या पोर्श कारमधून जात होता. त्याच्यासोबत त्याचा एक मित्रही होता. यावेळी रॅपिडोची वॅगन-आर कार साइड रोडवरून मुख्य रस्त्यावर येत असताना तिची अमीनच्या कारला धडक झाली. पोलिसांच्या माहितीनुसार, वॅगन-आर मुख्य रस्त्यावर येत असताना हा अपघात घडला.

    या घटनेत अमीन आणि त्याच्या मित्राला किरकोळ दुखापत झाली. दोघांनाही तातडीने कावेरी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. उपचारानंतर अमीनला घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. दुसरीकडे, वॅगन-आरमधील व्यक्तीलाही दुखापत झाली असून त्याला कलैग्नर सेंटेनरी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

    अमीनसोबत याआधीही एक मोठी दुर्घटना घडली होती. २०२३ मध्ये गाण्याच्या शूटिंगदरम्यान क्रेनला लावलेला जड झुंबर आणि ट्रस अचानक त्याच्यावर कोसळला होता. सुदैवाने त्यावेळीही तो थोडक्यात बचावला. अमीन हा संगीत क्षेत्रात प्लेबॅक सिंगर आणि म्युझिक प्रोड्यूसर असून, ‘दिल बेचारा’ आणि ‘2.0’ यांसारख्या चित्रपटांसाठी त्याने गाणी गायली आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    बापरे! मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोटाने खळबळ!

    September 6, 2026

    दिल्लीत 5 मजली इमारत कोसळली

    September 6, 2026

    नव्या टीमनंतर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग

    September 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif