Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शहरे गुदमरली; नागरिकांचा श्वास कोंडला!
    • एक्सप्रेसवेवर बस ४० फूट खोल कोसळली; ३ जणांचा मृत्यू
    • गोळीबारातील ‘त्या’ जखमी तरुणाचा मृत्यू
    • रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी
    • गोकुळच्या सत्तासंघर्षाचा वाद आता रस्त्यावर उतरला
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    • 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»संपादकीय»पाच हजारांची तुटपुंजी रक्कम ७३ लाख शेतकऱ्यांना वाटप!
    संपादकीय

    पाच हजारांची तुटपुंजी रक्कम ७३ लाख शेतकऱ्यांना वाटप!

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveNovember 5, 2026No Comments64 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही संपादकीय लेख 

    महाराष्ट्र सरकारने राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर दिवाळीपूर्वी ५,००० रुपये अग्रीम रक्कम टाकण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. एकूण ७३ लाख शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळाला आहे. बाकी उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यांवरही लवकरच पाच हजार रुपये टाकण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. सणाच्या तोंडावर महाराष्ट्र सरकारने ही पाच हजार रुपयांची अग्रीम रक्कम टाकली आहे. ती अत्यंत तुटपुंजी आहे. एक तर दुष्काळामुळे शेतकरी होरपळून निघालेला आहे. त्यातच खरिपाचे पीक पूर्णपणे त्याच्या हातातून गेले आहे. खरीप पिकाचे उत्पन्न शून्य त्याच्या घरात आले आहे. दुष्काळाचे सावट असल्यामुळे पूर्ण गारद झालेल्या शेतकऱ्याच्या घरात दिवाळीपूर्वी ५,००० रुपयांमध्ये काय होते? त्यांनी मुलाबाळांना कपडे घ्यावीत की घरात किराणा आणावा, की किरकोळ आजाराला सामोरे जाण्यासाठी लागणारे पैसे द्यावेत, की फराळ करण्यासाठी पैशांची तजवीज करावी? फटाके वगैरे तर सोडूनच द्या. यावर्षी सर्व गोष्टी करण्यासाठी त्याच्या हातात पाच हजार रुपये दिले, तर ते पैसे एका चुटकीसरशी संपून जातील. कारण महागाईचा कहर इतका झाला आहे की, प्रत्येक वस्तू महाग आहे. तेल, तूप, डाळी, साखर या सर्व वस्तूंचे भाव आकाशाला भिडले आहेत. त्यामुळे किती वस्तू घ्याव्यात, हे त्याला कळत नाही. दुष्काळ जाहीर झाला; पण अद्याप पंचनामे झालेले नाहीत. त्यासाठी महाराष्ट्र सरकार काही करू शकत नाही. केंद्र शासनाची मदत अद्याप जाहीर झालेली नाही. त्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. त्यासाठी प्रत्येक दुष्काळग्रस्त शेतकऱ्याला हेक्टरी एक लाख रुपये मिळावेत, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. अनेक ठिकाणी तसे शेतकऱ्यांचे मोर्चेदेखील निघाले. परवा संभाजीनगर येथे शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा निघाला. ५,००० रुपये रक्कम दिल्याने शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत. त्यांच्यासमोर अनेक समस्या आहेत. त्यांच्याकडे असलेल्या गुराढोरांचे पोषण करण्यासाठी त्याला चाऱ्यासाठी पैसे लागणार आहेत. गुरांना लागणारा चारा त्यांनी आणावा कुठून, हा एक यक्षप्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. रेशनिंगचे धान्य मोफत मिळत असल्याने माणसाच्या पोटापाण्याचा प्रश्न सुटू शकतो; परंतु मुक्या जनावरांना चारा कुठून आणणार, ही समस्या शेतकऱ्यांसमोर आ वासून उभी आहे. सध्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न नाही; पण भविष्यात पिण्याच्या पाण्याचेही मोठे संकट उभे राहणार आहे. चारा तुम्ही आणू शकाल; पण मुक्या जनावरांना पिण्याचे पाणी कसे आणणार, ही त्यांच्यासमोर उभी असलेली समस्या सोडवावी लागेल. पिण्याचे पाणी ही एक मोठी आणि अतिमहत्त्वाची समस्या आहे. सर्व काही होऊ शकेल; पण पिण्याचे पाणी कसे आणाल, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. आतापासून शेतकरी वर्गाकडून आपल्या पशुधनाची विक्री सुरू झाली आहे. जेणेकरून भविष्यात त्यांच्या चारा व पाण्याचा प्रश्न उद्भवणार नाही. तसेच स्वतःसाठी जे काही पैसे लागतील, ते पशुधन विकून जमा करण्याचा त्यांचा उद्देश आहे. त्यामुळे आता जर पशुधनाची विक्री केली गेली, तर भविष्यात शेती कशी करतील, हा एक प्रश्न आहे. गाई, म्हशी आणि बैल यांची जर शेतकऱ्यांकडून आज विक्री झाली, तर दुधापासून मिळणारे उत्पन्न हातचे जाईल आणि बैलांची जर विक्री झाली, तर पुढच्या वर्षी शेती कशी करणार, ही समस्या आहे. या दुष्काळामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. त्याला जर शासनाने भरीव अशी मदत केली नाही, तर तो आणखी उद्ध्वस्त होईल. एका दुष्काळामुळे तो दहा वर्षे मागे फेकला जाणार आहे. त्यातच मुला-मुलींचे लग्न करायचे असतील, तर ते त्याला टाळता येणार नाही. मुला-मुलींची लग्ने तर त्याला करावीच लागतील. या सर्व समस्यांच्या गर्दीत तो सापडला आहे. त्यातून त्याची सुटका होणे नाही. त्यासाठी शासनाने त्याला जर मानसिक आधार दिला, तर तो उभा राहू शकतो. अन्यथा शेतकरी कोलमडून पडल्याशिवाय राहणार नाही. या सर्व समस्यांमधून सुटका करून घेण्यासाठी तो आत्महत्येसारखा मार्ग अवलंबतो. त्याच्या आत्महत्या रोखायच्या असतील, तर शेतकऱ्यांना मदत करणे ही काळाची गरज आहे. अन्यथा महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढेल. त्या आत्महत्या रोखण्यासाठी त्याला मानसिक आधार देण्याची गरज आहे. ती मदत त्याला मात्र मायबाप सरकारकडूनच मिळू शकते आणि ती महत्त्वाची मदत मिळालीच पाहिजे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव

    November 8, 2026

    दिवाळी सण उजळला, शेतकऱ्यांमध्ये मात्र अंधार!

    November 7, 2026

    जिल्हा बँक निवडणुकीत महायुतीचे जागावाटप गिरीश महाजनांकडे!

    November 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif