Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची? निकाल अंतिम टप्प्यात!
    • हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे : लक्ष्मण हाकेंचा आरोप
    • बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून
    • चक्क शिंदेसेनेच्या नगरसिवेकेवर गुन्हा दाखल
    • मनोज जरांगे पाटलांना पोलिसांची नोटीस
    • गणेशोत्सवाच्या धामधुमीत किरकोळ वादातून गोळीबार!
    • बापरे! 40 विद्यार्थ्यांची बस सुपे घाटात उलटली!
    • जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईकडे निघाला!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»अपघात»नव्याने बांधलेली चार मजली इमारत कोसळली
    अपघात

    नव्याने बांधलेली चार मजली इमारत कोसळली

    दुर्घटनेत तिघांचा मृत्यू : एकाची सुखरूप सुटका
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 9, 2026No Comments339 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    पुण्यातील पिंपरी चिंचवडमधील मोशीमध्ये इमारत कोसळून कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली २१ कामगार अडकल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. ही घटना ताजी असतानाच दुसरीकडे मुसळधार पावसामुळे दिल्लीतील रोहिणी परिसरात नव्याने बांधलेली चार मजली इमारत कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला असून एकाची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. ही घटना रोहिणी सेक्टर-१६ मधील जी-४ पॉकेट परिसरात बुधवारी दुपारी सुमारे ४.२८ वाजता घडली. केएनके मार्ग पोलीस ठाण्याजवळची इमारत कोसळल्याची माहिती मिळाली आणि एकच खळबळ उडाली. आणखी काही जण अडकल्याची भीती असून बचावकार्य सुरु आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीत गेले २ ते ३ दिवस सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. आज देखील हवामान विभागाने दिल्लीला रेड अलर्ट दिला आहे. मुसळधार पडलेल्या पावसाने नागरिकांची दैना केली आहे. बुधवारी ४ च्या सुमारास रोहिणी सेक्टर-१६ मधील जी-४ पॉकेट परिसरात केएनके मार्ग पोलीस ठाण्याजवळची अलीकडेच नव्याने बांधण्यात आलेली इमारत अचानक जमीनदोस्त झाली.माहिती मिळताच पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. तेव्हा जी-४/१५१-१५२ येथील नव्याने बांधलेली चार मजली इमारत पूर्णपणे कोसळून तिचा मोठा ढिगारा रस्त्यावर पसरल्याचे आढळून आले. स्थानिक नागरिकांनी काही नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती दिल्यानंतर बचावकार्याला वेग देण्यात आला.

    घटनेची गंभीरता लक्षात घेऊन राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), दिल्ली अग्निशमन सेवा (डीएफएस), टीपीडीडीएल तसेच इतर यंत्रणांना पाचारण करण्यात आले. ढिगाऱ्याखालून जखमींना बाहेर काढून तातडीने बीएसए रुग्णालयात दाखल करण्यात आले.रुग्णालयात राम किशन यांचा मुलगा राम (४२) याला मृत घोषित करण्यात आले. त्यानंतर बचावकार्यादरम्यान आणखी दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले. मृतांमध्ये राम दुआ (६२) आणि काफे उर्फ नुरुल (२४) यांचा समावेश असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. दुसरीकडे, सद्दाम उर्फ रवी (३२) याला ढिगाऱ्याखालून जिवंत बाहेर काढण्यात बचाव पथकांना यश आले.

    बचाव मोहिमेदरम्यान पथकांनी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या एका नागरिकाशी संपर्क साधला होता. त्याला सुरुवातीला पाणी पुरवण्यात आले. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी जवळच्या रुग्णालयातून ऑक्सिजन सिलेंडरची व्यवस्था करून त्या व्यक्तीपर्यंत ऑक्सिजन पोहोचवला. या तत्परतेमुळे त्याचा जीव वाचवण्यात मदत झाली. रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरू होते. सध्या ढिगारा हटवण्याचे काम सुरू आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून

    September 16, 2026

    बापरे! 40 विद्यार्थ्यांची बस सुपे घाटात उलटली!

    September 16, 2026

    शालेय पोषण आहाराचा टेम्पो उलटून मजुरांचा जागीच मृत्यू

    September 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif