लोकशाही न्यूज नेटवर्क
एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. सोलापूरमध्ये एका नवजात अर्भकाचे लचके तोडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. धक्कादायक म्हणजे सोलापूरमध्ये नेहमी वर्दळ असणाऱ्या रुपाभवानी परिसरात ही घटना घडली आहे. या प्रकराने सोलापूरमध्ये खळबळ उडाली आहे.
सोलापूरमधील रुपभवानी मंदिर परिसरातील नाल्यात पुरुष जातीच्या अर्भकाला फेकून दिले होते. या अर्भकाचे लचके तोडले आहेत. या घटनेची बातमी वाऱ्यासारखी परसली. बातमी पसरताच बघ्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. या घटनेची पोलिसांनी दखल घेतली आहे. घटनास्थळी पोलिस पाहणी करत आहेत.
दरम्यान, सदर प्रकारात अनैतिक संबंधातून किंवा अन्य कारणाने अर्भकाला टाकून दिले असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहे. पोलिसांना मृत अर्भक शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहे. अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच पुण्यातही नवजात बाळाला रस्त्यावर सोडून दिल्याची धक्कादायक घटना काल उघडकीस आली. वडगाव बुद्रुकमध्ये ही घटना घडली होती. बाळाचा रडण्याचा आवाज येऊ नये म्हणून त्याच्या तोंडाला पिशवी बांधण्यात आली होती. नवजात बाळाला रस्त्यावर सोडून दिले. या घटनेने आजूबाजूच्या परिसरात खळबळ उडाली आहे.