Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»राजकारण»महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा अध्याय सुरू
    राजकारण

    महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा अध्याय सुरू

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 1, 2025Updated:July 1, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. त्यातच आता येत्या ५ जुलै रोजी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या विजयी मेळाव्याची अधिकृत निमंत्रण पत्रिका समोर आली आहे. वरळीतील प्रसिद्ध डोम सभागृहात हा ऐतिहासिक मेळावा पार पडणार आहे. त्याच्या निमंत्रण पत्रिकेत ‘राज ठाकरे – उद्धव ठाकरे’ असे नमूद करण्यात आले आहे, ज्यामुळे दोन्ही बंधूंच्या एकत्र येण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

    हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाविरोधात मराठी एकजुटीने मिळवलेल्या विजयाच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. निमंत्रण पत्रिकेत थेट मराठी जनतेला उद्देशून भावनिक आवाहन करण्यात आले आहे. “आवाज मराठीचा!” असे शीर्षक या पत्रिकेला देण्यात आले आहे. “मराठी मातांनो, भगिनींनो आणि बांधवांनो, सरकारला नमवलं का? तर हो नमवलं…! कोणी नमवलं तर ते तुम्ही, मराठी जनांनी नमवलं!” असेही यात नमूद करण्यात आले आहे.

    आवाज मराठीचा ! मराठी मातांनो, भगिनींनो आणि बांधवांनो, सरकारला नमवलं का ? तर हो नमवलं…! कोणी नमवलं तर ते तुम्ही, मराठी जनांनी नमवलं ! आम्ही फक्त तुमच्या वतीने संघर्ष करत होतो. त्यामुळे हा आनंद साजरा करतानासुद्धा, आम्ही फक्त या मेळाव्याचे आयोजक आहोत, बाकी जल्लोष तुम्ही करायचा आहे. वाजत गाजत या, जल्लोषात, गुलाल उधळत या !! आम्ही वाट बघतोय…!, आपले नम्र राज ठाकरे – उद्धव ठाकरे, असा मजकूर या पत्रिकेत पाहायला मिळत आहे. यामुळे सध्या महाराष्ट्रात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यामुळे उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

     

    निमंत्रण पत्रिकेत काय?

    आवाज मराठीचा !

    मराठी मातांनो, भगिनींनो आणि बांधवांनो, सरकारला नमवलं का ? तर हो नमवलं…!

    कोणी नमवलं तर ते तुम्ही, मराठी जनांनी नमवलं !

    आम्ही फक्त तुमच्या वतीने संघर्ष करत होतो.

    त्यामुळे हा आनंद साजरा करतानासुद्धा, आम्ही फक्त या मेळाव्याचे आयोजक आहोत, बाकी जल्लोष तुम्ही करायचा आहे.

    वाजत गाजत या, जल्लोषात, गुलाल उधळत या !! आम्ही वाट बघतोय…!

    आपले नम्र

    राज ठाकरे – उद्धव ठाकरे

    या मेळाव्यातून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा अध्याय सुरू करत आहेत. हिंदी सक्तीच्या निर्णयाला स्थगिती मिळाल्यानंतर मराठी भाषेच्या सन्मानासाठी मिळालेला हा विजय साजरा करण्यासाठी ही सभा आयोजित करण्यात आली आहे. या मेळाव्यानंतर भविष्यात ठाकरे बंधू एकत्र येणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या निमंत्रण पत्रिकेमुळे मेळाव्याबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात

    May 14, 2026

    खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर

    May 13, 2026

    पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार

    May 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif