अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

0

एरंडोल – शहरातील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, भवानी नगर परिसरात वास्तव्यास असलेले प्रताप शिवालाल महाजन (वय ३५, व्यवसाय मजुरी) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांची मुलगी कु. पूजा प्रताप महाजन (वय १६ वर्षे ५ महिने) हिला दिनांक २१ जानेवारी २०२६ रोजी रात्री ८ वाजेनंतर भवानी नगर येथून गोपाल जुलाल कुंभार यांच्या विटभट्टी परिसरातून कोणीतरी अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, आरोपीला पीडित मुलगी अल्पवयीन असल्याची पूर्ण कल्पना असतानाही हे कृत्य करण्यात आले आहे. या प्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात गुरन क्रमांक ०६/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम १३७(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्याची नोंद दिनांक २२ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६.०६ वाजता करण्यात आली असून या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस हवालदार विजय पाटील करीत आहेत. अद्याप आरोपीस अटक करण्यात आलेली नसून पोलिसांकडून शोधमोहीम सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.