Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • आदिवासी लोक संघर्ष मोर्चाला किती ताण देणार?
    • दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी तुटपुंज्या मदतीत!
    • एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!
    • मसाल्यांतील भेसळीविरुद्ध राज्यभर कठोर कारवाईचे आदेश!
    • पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास
    • अदानी-अंबानींचे २० लाख कोटी रुपयांचे कर्जमाफी मग..
    • एसटी तोट्यात, तरी भाडेवाढीचा भार टाकणार नाही!
    • वाचनातून व्यक्तिमत्व सर्जनशील होते : चंद्रकांत चव्हाण
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»अपघात»बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून
    अपघात

    बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून

    अंतुर्ली बुद्रुक शिवारात बिबट्याचे दर्शन : शेतकऱ्यांमध्ये भीती
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 16, 2026No Comments356 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    भातखंडे, लोकशाही न्यूज नेटवर्क

    अंतुर्ली बुद्रुक शिवारात दिवसाढवळ्या बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गट क्रमांक २२६ (हर्षल रवींद्र समदाणी) आणि गट क्रमांक १२६/२ (निंबा दगा पाटील) यांच्या शेतशिवारात ही घटना घडली.

    मिळालेल्या माहितीनुसार, ज्येष्ठ शेतकरी निंबा दगा पाटील यांचे तरुण शेतकरी राहुल निंबा पाटील हे बैलगाडीने शेताकडे जात असताना अचानक बिबट्या त्यांच्या दिशेने धावत आला. प्रसंगावधान राखत राहुल पाटील यांनी तातडीने बैलगाडीवर चढून मोठ्याने आरडाओरड केली. बैलांच्या हालचाली आणि राहुल पाटील यांच्या आरडाओरडीमुळे बिबट्या काही मिनिटांतच तेथून पळून जाऊन शिवारातील झुडपांमध्ये पसार झाला.

    दिवसा बिबट्याने थेट अंगावर धावून आल्याच्या या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शेतात काम करणाऱ्या शेतकरी व मजुरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, वन विभागाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

    बिबट्याचा वावर लक्षात घेता वन विभागाने तात्काळ पिंजरा लावून त्याचा बंदोबस्त करावा, तसेच शेतकऱ्यांना सतर्कतेच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी भातखंडे बुद्रुक व अंतुर्ली बुद्रुक येथील शेतकरी आणि ग्रामस्थांनी केली आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!

    October 15, 2026

    पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास

    October 15, 2026

    आकाशवाणी उड्डाणपुलावर तरुणावर काळाचा घाला

    October 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif