Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नव्या आयुक्तांकडून अपेक्षा!
    • जळगाव आयुक्तपदी आदित्य जिवणे यांची नियुक्ती 
    • तुकाराम मुंढे यांचा धडाका : भेसळकरांना भरली धडकी!
    • अमृत योजनेच्या निकृष्ट कामाविरोधात मनपावर ‘घागर फोडो’ मोर्चा!
    • इस्रायलमध्ये शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार
    • कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या केळी उत्पादकांच्या प्रश्नांवर उच्चस्तरीय बैठक
    • पाकिस्तानच्या जवानांचा थेट कामावर येण्यास नकार
    • युवासेना आयोजित जिल्हास्तरीय ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»उन्हात तहानलेल्या मुक्या जीवांसाठी मदतीचा हात; रमेशकुमार मुनोत यांच्याकडून पांजरापोळला १०० जलकुंड भेट
    ताज्या बातम्या

    उन्हात तहानलेल्या मुक्या जीवांसाठी मदतीचा हात; रमेशकुमार मुनोत यांच्याकडून पांजरापोळला १०० जलकुंड भेट

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 2, 2026No Comments141 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    ▪️दीड महिन्यात ५०० परळ, ५०० जलकुंड वाटप
    ▪️पावसाळ्यात राबवणार नाविन्यपूर्ण उपक्रम

    जळगाव |  उन्हाच्या तीव्र झळा सहन करत असलेल्या मुक्या जीवांच्या मदतीसाठी पुढाकार घेत समाजसेवेचा आदर्श घालून देणारे ओम् साई रिअल इस्टेट कन्सल्टेंट्सचे संचालक तथा समाजसेवक रमेशकुमार मुनोत यांनी जळगाव येथील श्री पांजरापोळ संस्थेला १०० जलकुंड भेट देत पशुप्रेमाची अनोखी जाणीव करून दिली आहे. या जलकुंडांमुळे गाय व वासरांसह अन्य जनावरांना उन्हाळ्यात स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार आहे.

    यंदाच्या उन्हाळ्यात जळगाव जिल्ह्यात तापमानाने अनेकदा ४५ अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला होता. वाढत्या उष्णतेमुळे पशू-पक्ष्यांचे मोठे हाल होत असताना त्यांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर बनली होती. अशा परिस्थितीत केवळ चिंता व्यक्त न करता प्रत्यक्ष कृती करत रमेशकुमार मुनोत यांनी पशू-पक्ष्यांसाठी मोफत परळ व जलकुंड वितरणाचा उपक्रम राबवला.

    १००० पेक्षा जास्त परळ, जलकुंड वाटप
    उपक्रमाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, गेल्या दीड महिन्यात त्यांनी ५०० हून अधिक परळ आणि ५०० हून अधिक जलकुंडांचे मोफत वितरण केले आहे. त्यांच्या या कार्यामुळे अनेक ठिकाणी पक्षी व जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय निर्माण झाली असून, पर्यावरण संवर्धनाबाबतही सकारात्मक संदेश समाजात पोहोचत आहे.

    अनेकांसाठी प्रेरणादायी प्रवास
    रमेशकुमार मुनोत यांचे हे कार्य केवळ दानधर्मापुरते मर्यादित नसून निसर्ग, पर्यावरण आणि मुक्या जीवांप्रती असलेल्या संवेदनशीलतेचे प्रतीक आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात प्राणी-पक्ष्यांच्या गरजांकडे दुर्लक्ष होत असताना त्यांनी दाखवलेली सामाजिक बांधिलकी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

    पावसाळ्यात राबवणार ‘हरीत जळगाव’ उपक्रम
    विशेष म्हणजे, जळगाव शहर पुन्हा हिरवेगार व्हावे, पर्यावरणाचे संतुलन टिकून राहावे आणि निसर्गचक्र सुरळीत रहावे यासाठी येत्या पावसाळ्यातही ते विविध नाविन्यपूर्ण पर्यावरणपूरक उपक्रम राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या या उपक्रमांमुळे समाजात पर्यावरण संवर्धन आणि पशू-पक्षी संरक्षणाबाबत जागृती निर्माण होण्यास निश्चितच मदत होणार आहे.

    रमेशकुमार मुनोत यांचा हा उपक्रम समाजातील प्रत्येक व्यक्तीला एक संदेश देतो. मुक्या जीवांना पाण्याचा एक थेंब देणेही मोठी समाजसेवा ठरू शकते. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेत अधिकाधिक नागरिकांनी पशू-पक्ष्यांच्या संरक्षणासाठी पुढे यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जळगाव आयुक्तपदी आदित्य जिवणे यांची नियुक्ती 

    June 9, 2026

    इस्रायलमध्ये शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार

    June 9, 2026

    कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या केळी उत्पादकांच्या प्रश्नांवर उच्चस्तरीय बैठक

    June 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif