Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमास वेग
    • महामार्गावर तीन नव्हे, चार उड्डाणपूल हवेत!
    • गुटखा, पान मसाला आणि इतर प्रतिबंधित उत्पादनांवर बंदी
    • मुंबई पोलीस दलाची प्रतिमा काळवंडली
    • दूध संघात उद्या प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचे उद्घाटन
    • वंदे मातरम्‌‍ला राष्ट्रगीताप्रमाणेच कायदेशीर संरक्षण!
    • भाविकांच्या गाडीला अपघात : १२ जण जखमी
    • मराठी येत नसल्यास चालकाचे लायसन्स होणार रद्द!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»शैक्षणिक»आदिवासी विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी : आजच अर्ज करा!
    शैक्षणिक

    आदिवासी विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी : आजच अर्ज करा!

    NEET, JEE व CET परीक्षांसाठी मोफत मार्गदर्शन : अर्ज सुरू!
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 26, 2026No Comments164 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

    अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय व अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर घडविण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर यांच्या वतीने सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता ११ वी विज्ञान शाखेत प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी मोफत NEET, JEE व CET प्रवेश परीक्षा मार्गदर्शन योजना राबविण्यात येत आहे.

    इच्छुक विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले असून, पात्र विद्यार्थ्यांची निवड चाचणी परीक्षेद्वारे केली जाणार आहे. या योजनेअंतर्गत १२ जुलै २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता शासकीय आश्रमशाळा, बोर्डा (ता. जि. चंद्रपूर) येथे दुसऱ्या चाचणी परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. या परीक्षेतील गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांची निवड केली जाणार असून, ४० टक्के विद्यार्थी शासकीय व अनुदानित आश्रमशाळांतून, ३० टक्के विद्यार्थी एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूलमधून आणि उर्वरित ३० टक्के विद्यार्थी शासकीय, खाजगी व मान्यताप्राप्त माध्यमिक शाळांतून निवडले जातील.

    प्रसंगी इच्छुक विद्यार्थ्यांनी २ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत आपले अर्ज प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर कार्यालयात सादर करावेत. अधिक माहितीसाठी कनिष्ठ लिपिक श्री. गोंडाणे यांच्याशी ९०४९३३८७१३ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधता येईल.

    याशिवाय अर्जासोबत विद्यार्थ्यांनी संपूर्ण नाव, आईचे नाव, सध्याच्या प्रवेशित शाळेचे नाव, जन्मतारीख, जातीचे नाव, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक व संपूर्ण पत्ता (इंग्रजीमध्ये) नमूद करणे आवश्यक आहे. तसेच ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी दर्जेदार आणि मोफत मार्गदर्शन उपलब्ध करून देत उच्च शिक्षणाच्या संधी निर्माण करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मराठी भाषा विभागाच्या सात संकेतस्थळांचे नव्या डोमेनवर स्थलांतर पूर्ण

    August 7, 2026

    पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलच्या तीन विद्यार्थिनींचे घवघवीत यश

    August 4, 2026

    वृक्षसंवर्धनाचा वंजारी येथील ग्रामस्थांचा निर्धार!

    August 2, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif