Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ओझरखेडा तलावामध्ये हतनूर धरणाचे पाणी!
    • TET पेपरफुटी : सोलापुरातून प्रशिक्षण केंद्र चालकाला अटक
    • मंत्रिमंडळ बैठकीत ७ महत्त्वाचे निर्णय
    • वेल्हाळे कपिलेश्वर महादेव मंदिरात १७ ऑगस्टला मुकुट सोहळा
    • राजस्थानमधील व्यापाऱ्याकडून सात लाखांची फसवणूक
    • पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड
    • खिडकीतून मण्यार आता घुसला अन् होत्याचे नव्हते!
    • भर पावसातली महाबळेश्वर पिकनिक थेट जीवावर बेतली
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»शैक्षणिक»नव्या स्वप्नांची नवी सुरुवात; आश्रमशाळांमध्ये प्रवेशोत्सवाचे आयोजन
    शैक्षणिक

    नव्या स्वप्नांची नवी सुरुवात; आश्रमशाळांमध्ये प्रवेशोत्सवाचे आयोजन

    नवीन विद्यार्थ्यांचे औक्षण, शैक्षणिक साहित्याचे वाटप : गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी विविध उपक्रमांची माहिती
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 26, 2026No Comments28 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

    आदिवासी विकास विभाग, नागपूर अंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर यांच्या वतीने प्रकल्प कार्यक्षेत्रातील सर्व शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये मंगळवार, ३० जून २०२६ रोजी प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी आत्मीयता व आनंदाचे वातावरण निर्माण करण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.

    प्रवेशोत्सवानिमित्त नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांचे शाळेत स्वागत करण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, वह्या, पेन, पेन्सिल आदी शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जाणार आहे. विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी शाळेविषयी आपलेपणाची भावना निर्माण व्हावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.

    या दरम्यान प्रकल्पांतर्गत आश्रमशाळांमध्ये नियमित शिक्षणाबरोबरच अभ्यास सत्रे, उन्हाळी शिबिरे, बालक वर्ग, ब्रिज कोर्स, जेईई/नीट प्रवेश परीक्षा मार्गदर्शन, मिशन शिक्षण, शिक्षण पेटी, भारत स्काउट अँड गाईड तसेच महाराष्ट्र इंटरनॅशनल एज्युकेशन मिशनसारखे विविध शैक्षणिक व व्यक्तिमत्त्व विकासाचे उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

    प्रत्येक आश्रमशाळेत लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, पालक, आदिवासी सेवक व मान्यवरांच्या उपस्थितीत प्रवेशोत्सव साजरा होणार असून, नव्या विद्यार्थ्यांच्या पालकांचेही स्वागत व सत्कार करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात पालकांचा सक्रिय सहभाग वाढावा, यासाठी विशेष जनजागृतीही करण्यात येणार आहे.

    या कार्यक्रमास प्रकल्प अधिकारी विकास एस. राजलवार तसेच उपायुक्त तथा प्रमुख पाहुणे मा. प्रिती बनसोड उपस्थित राहणार असून, त्यांच्या हस्ते प्रवेशोत्सवाचा शुभारंभ होणार आहे. या प्रसंगी प्रकल्प अधिकारी विकास एस. राजलवार यांनी सर्व पालक, ग्रामस्थ व लोकप्रतिनिधींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवावा आणि शिक्षणाच्या या पवित्र उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मराठी भाषा विभागाच्या सात संकेतस्थळांचे नव्या डोमेनवर स्थलांतर पूर्ण

    August 7, 2026

    पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलच्या तीन विद्यार्थिनींचे घवघवीत यश

    August 4, 2026

    वृक्षसंवर्धनाचा वंजारी येथील ग्रामस्थांचा निर्धार!

    August 2, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif