पाठलाग करून चार चाकी वाहन जप्त
अवैध सुगंधित तंबाखू हस्तगत : स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांची कारवाई
चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क
स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरचे पथक भिसी हद्दीत पेट्रोलिंग करीत असता, शासनाने प्रतिबंधित केलेला अवैध सुगंधित तंबाखू चार चाकी वाहनात वाहतूक करीत असल्याची गोपनीय माहीती मिळताच त्या वाहनाच्या संपुर्ण माहीती वरून पाठलाग केला असता, Harrier कंपनीचा एमएच – 44 एस 3838 क्रमांक चार चाकी वाहन पकडण्यात पोलिसांना यश आले.
या दरम्यान चालक वाहन सोडून पळून गेल्याने वाहनांची तपासणी केली असता, विविध कंपनीचा अवैध सुगंधित तंबाखू वाहनात आढळून आला. चालका विरुध्द कारवाई केली असून त्यात संपुर्ण अवैध तंबाखूजन्य पदार्थसह वाहन जप्त करून १७ लाख ५५ हजार ४४० रुपये असा मुद्देमाल जप्त करुन पोलिस स्टेशन भिसी येथे अपराध क्र. २४ कलम २२३, २७५, भा. न. स. सहकलम ३० (२) २६ (२) ३ ४ ५९ (१) अन्नसुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ प्रमाणे अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा नोंद केला असून पुढील तपास पोलीस करीत आहे.
सदर कारवाई पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू, यांचा मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक महेश कोंडावार यांचा नेतृत्वात स. पो. नि. बलराम झाडोकर, पो. उप नि. मधुकर सामलवार पो. उप. नि. संपोश निंभोरकर सुरेंद्र महतो संजय वाढई गणेश मोहुर्ले प्रमोद कोटनाके यांनी केली.