Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    • 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार
    • कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ
    • अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ
    • दिवाळी : दंतकथांमागील शहाणपण
    • हे पैसे तुमचे आहेत.. मोदीच्या बापाचे पैसे नाहीत!
    • दिवाळी सण उजळला, शेतकऱ्यांमध्ये मात्र अंधार!
    • फार्मर आयडीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना दिलासा
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»अपघात»पाच महिन्यांची गर्भवती महिला अचानक कोसळली
    अपघात

    पाच महिन्यांची गर्भवती महिला अचानक कोसळली

    दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveNovember 2, 2026No Comments305 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    किनगाव  ता. यावल

    यावल तालुक्यातील चुंचाळे गायरान येथील आदिवासी वस्तीवर दुर्दैवी घटना घडली. पाच महिन्यांची गर्भवती असलेल्या २६ वर्षीय महिलेचा अचानक चक्कर येऊन कोसळल्यानंतर मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

    सुरेखा दिनेश बारेला (वय २६) या चुंचाळे गावापासून सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या गायरान परिसरातील आदिवासी वस्तीत कुटुंबासह राहत होत्या. त्या पाच महिन्यांच्या गर्भवती होत्या. गेल्या दोन दिवसांपासून त्यांना त्रास जाणवत होता. शनिवारी रात्रीही त्रास होत असल्याने रविवारी सकाळी रुग्णालयात जाण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला होता.

    मात्र, रविवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास त्यांना अचानक चक्कर आली आणि त्या घरातच जमिनीवर कोसळून बेशुद्ध पडल्या. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार सोनवणे यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.

    याप्रकरणी दिनेश मोहन बारेला यांनी दिलेल्या खबरीवरून यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.

    पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संदीप सूर्यवंशी पुढील तपास करीत आहेत. पाच महिन्यांच्या गर्भवती महिलेचा अशा प्रकारे दुर्दैवी मृत्यू झाल्याने चुंचाळे गायरान परिसरात शोककळा पसरली असून, सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    लोकनियुक्त नगराध्यक्षा छाया पाटील यांना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा!

    November 6, 2026

    मच्छीमारांच्या बचावासाठी गेलेल्या दोन बोटी उलटल्या

    November 5, 2026

    दिल्ली बाजारात तीन मजली इमारत कोसळली

    November 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif