Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!
    • दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!
    • विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!
    • मनोज पाटील, शरद शिंदे, विनोद तराळसह संशयितांचे जामीन फेटाळले!
    • शाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा चिंतेचा विषय!
    • मराठी भाषा विभागाच्या सात संकेतस्थळांचे नव्या डोमेनवर स्थलांतर पूर्ण
    • ९ ऑगस्टला मोफत कायदेविषयक मार्गदर्शक शिबिर
    • फ्रीलांस करिअरच्या संधी
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»अपघात»बापाची जीवाची बाजी; जीव वाचला मात्र, अंधारात..
    अपघात

    बापाची जीवाची बाजी; जीव वाचला मात्र, अंधारात..

    लेकीच्या जीवासाठी बाप थेट बिबट्याशी भिडला
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 21, 2026No Comments386 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    बाप आपल्या लेकरांसाठी जिवाची पर्वा न करता, कसा संकटांना भिडतो याचे ज्वलंत उदाहरण अहिल्यानगर जिह्यात बघायला मिळाले. अकोले तालुक्यातील डोंगरगावमध्ये काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली आहे. आपल्या चार वर्षांच्या चिमुकलीला बिबट्याच्या जबड्यातून सोडवण्यासाठी एका पित्याने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता बिबट्याशी दोन हात केले. मात्र, मुलीची सुटका केल्यानंतर जीव वाचवण्यासाठी धावत असताना बाप-लेक दोघेही अंधारात खोल विहिरीत कोसळले. या थरारक घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर संगमनेरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

    काल रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास अकोले तालुक्यातील डोंगरगाव येथील मनोज गुंजाळ यांच्या चार वर्षीय मुलीवर, घराजवळ दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक झडप घातली. आईच्या पाठीवर असलेल्या अवनीला बिबट्याने तोंडात पकडून अंधाराच्या दिशेने ओढत नेण्यास सुरुवात केली. मुलीचा आक्रोश आणि आईचा आरडाओरडा ऐकताच वडील मनोज गुंजाळ यांनी क्षणाचाही विलंब न करता बिबट्याच्या दिशेने धाव घेतली. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मनोज गुंजाळ यांनी बिबट्याशी झुंज देत अवनीची सुटका केली.

    मात्र त्यानंतर मुलीला कडेवर घेऊन घराच्या दिशेने धावत असताना अंधारामुळे समोरील विहीर दिसली नाही आणि बाप-लेक दोघेही खोल विहिरीत कोसळले. ग्रामस्थांनी धाव घेत दोघांनाही विहिरीतून बाहेर काढले. बाप आणि लेकीवर संगमनेर येथील रुग्णालयात उपचार सुरू असून, बापाने आपल्या लेकीसाठी थेट बिबट्याशी दोन हात करत दाखवलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!

    August 8, 2026

    दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!

    August 8, 2026

    विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

    August 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif