एकदिवसीय मालिका वाचवण्यासाठी भारतासमोर “करो या मरो” ची स्थिती…

0

 

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क:

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, त्याच बरोबर वेगवान गोलंदाज उमरान मलिक प्लेइंग इलेव्हनमध्ये परतला आहे.

दुसऱ्या वनडेत बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. म्हणजेच भारतीय संघ प्रथम गोलंदाजी करणार आहे. उमरान मलिक भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये परतला आहे. उमरानला न्यूझीलंड दौऱ्यावर वनडे पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. त्याचवेळी, कुलदीप सेन आजच्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनचा भाग नाही.

पहिल्या वनडेत बांग्लादेशने 1 विकेटने शानदार विजय मिळवला होता. त्यामुळे भारताला मालिका वाचवण्यासाठी हा सामना कोणत्याही किंमतीवर जिंकावाच लागेल. त्याचबरोबर बांग्लादेश दुसऱ्या वनडेतही बाजी मारून मालिका जिंकण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. अशा स्थितीत आजचा सामना अतिशय रोमांचक होण्याची अपेक्षा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.