Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जिल्ह्यात तीन हजार गणेश मंडळ; 5 हजार पोलिसांचा बंदोबस्त!
    • लाडक्या बाप्पांचे उत्साहात आगमन!
    • जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मोर्चाची रणनीती ठरली!
    • आता गुरुजी सांगणार देश-विदेशात ऑनलाइन गणेश स्थापना
    • कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा
    • एमपीएससी परीक्षा प्रक्रिया : विद्यार्थ्यांसमोर शासन झुकले
    • एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना फासले काळे
    • अभिजीत दिपके अभी तो बच्चा है, कच्चा है!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»अपघात»मजुरी करून घरी परततांना काळाचा घाला
    अपघात

    मजुरी करून घरी परततांना काळाचा घाला

    ट्रालाच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveAugust 6, 2026Updated:August 6, 2026No Comments281 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    तालुक्यात पुन्हा एकदा बेफाम धावणाऱ्या अवजड वाहनाने एका निष्पाप तरुणाचा जीव घेतल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. साकेगाव येथून मजुरीचे काम करून घरी परतणाऱ्या सोनू रामा बागले (वय 29, रा. भवानी नगर, नशिराबाद) या तरुणाचा अपघातात जागीच चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे नशिराबाद व भवानी नगर परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, सोनू बागले हे दिवसभर साकेगाव येथे मजुरीचे काम आटोपून पिकअप वाहनाने घरी परतत होते. टोलनाका परिसरात आले असता, पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या एका टँकरने पिकअपला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, पिकअपमध्ये बसलेले सोनू बागले थेट रस्त्यावर फेकले गेले. त्याच वेळी मागून येणाऱ्या भरधाव ट्रालाचे चाक त्यांच्या अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच दुर्दैवी अंत झाला.

    मृत सोनू बागले हे हातमजुरी आणि बांधकामावर बिगारी काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबाचा मुख्य आधारवडच हिरावला गेला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुले, वडील आणि भाऊ असा परिवार आहे. घटनेचे वृत्त कळताच नातेवाईक व ग्रामस्थांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मोठी गर्दी केली होती.

    या प्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, या परिसरातून जाणाऱ्या अवजड वाहनांच्या बेफाम वेगावर तात्काळ नियंत्रण आणावे, अशी तीव्र मागणी आता नागरिकांमधून केली जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जिल्ह्यात तीन हजार गणेश मंडळ; 5 हजार पोलिसांचा बंदोबस्त!

    September 14, 2026

    कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा

    September 11, 2026

    जळगावसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार

    September 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif