Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • आदिवासी लोक संघर्ष मोर्चाला किती ताण देणार?
    • दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी तुटपुंज्या मदतीत!
    • एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!
    • मसाल्यांतील भेसळीविरुद्ध राज्यभर कठोर कारवाईचे आदेश!
    • पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास
    • अदानी-अंबानींचे २० लाख कोटी रुपयांचे कर्जमाफी मग..
    • एसटी तोट्यात, तरी भाडेवाढीचा भार टाकणार नाही!
    • वाचनातून व्यक्तिमत्व सर्जनशील होते : चंद्रकांत चव्हाण
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»अपघात»ज्यांनी अनेकांचे प्राण वाचवले, त्यांच्यावरच काळाचा घाला!
    अपघात

    ज्यांनी अनेकांचे प्राण वाचवले, त्यांच्यावरच काळाचा घाला!

    १०८ ॲम्बुलन्स चालकाचा अपघातात जागीच मृत्यू
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 1, 2026No Comments440 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    अमळनेर

    अमळनेर तालुक्यातील लोंढवे फाट्याजवळ सोमवारी (दि. २८) रात्री सव्वानऊ वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात १०८ ॲम्बुलन्सचे चालक अर्जुन हिरामण लोखंडे (वय अंदाजे ५२) यांचा जागीच मृत्यू झाला. अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून आरोग्य विभागात शोककळा पसरली आहे.

    अर्जुन लोखंडे हे मूळचे करणखेडा येथील रहिवासी असून सध्या अमळनेर येथील राजे संभाजीनगर कॉलनीत कुटुंबासह राहत होते. ते जानवे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या १०८ रुग्णवाहिकेवर चालक म्हणून कार्यरत होते. तत्पर सेवा देणारे चालक म्हणून त्यांची ओळख होती.

    सोमवारी रात्री लोखंडे हे मोटरसायकल क्रमांक एमएच ५४ ए ४८६८ वरून जात असताना लोंढवे फाट्यावरील हॉटेल रुद्राक्षी परिसरात अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेमुळे ते दुचाकीसह रस्त्यावर फेकले गेले. त्यांच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

    अपघातानंतर अज्ञात वाहनचालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला. दरम्यान, अपघातानंतर लोखंडे हे सुमारे अर्धा तास जखमी अवस्थेत रस्त्यावर पडून असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, इतरांच्या मदतीसाठी धावणाऱ्या १०८ रुग्णवाहिकेचे चालक असलेल्या लोखंडे यांच्यासाठीच रुग्णवाहिका वेळेवर पोहोचू शकली नाही.

    रुग्णवाहिका पोहोचण्यास झालेल्या विलंबामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, आपत्कालीन सेवेच्या कार्यक्षमतेबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

    घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!

    October 15, 2026

    पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास

    October 15, 2026

    आकाशवाणी उड्डाणपुलावर तरुणावर काळाचा घाला

    October 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif