Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जिल्ह्यात तीन हजार गणेश मंडळ; 5 हजार पोलिसांचा बंदोबस्त!
    • लाडक्या बाप्पांचे उत्साहात आगमन!
    • जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मोर्चाची रणनीती ठरली!
    • आता गुरुजी सांगणार देश-विदेशात ऑनलाइन गणेश स्थापना
    • कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा
    • एमपीएससी परीक्षा प्रक्रिया : विद्यार्थ्यांसमोर शासन झुकले
    • एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना फासले काळे
    • अभिजीत दिपके अभी तो बच्चा है, कच्चा है!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»संपादकीय»अभिजीत दीपकेच्या मागे चौकशीचे षडयंत्र!
    संपादकीय

    अभिजीत दीपकेच्या मागे चौकशीचे षडयंत्र!

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveAugust 9, 2026No Comments608 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही संपादकीय लेख

    कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीच्या जंतर-मंतरवर आंदोलन यशस्वी झाले. या आंदोलनामुळे शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. गेल्या बारा वर्षांत कधीही न झुकणारे मोदी सरकार बॅकफुटवर गेले आणि त्याचा परिणाम म्हणून धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर जंतर-मंतरवरील आंदोलनातून अभिजीत दीपके यांनी माघार घेत आंदोलन समाप्त केले. परंतु, त्यानंतर जे कवित्व सुरू आहे, ते लक्षात घेण्यासारखे आहे. २० जुलै रोजी जंतर-मंतरवर पोलिसांनी लाठीचार्ज केला, अश्रुधुराचा मारा केला तसेच पॅलेट गनचा वापर केला. त्यावरून गृहमंत्री अमित शहा यांनी जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी लावून धरली. संसदेत अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हजर राहत नाहीत, यावरूनही संसदेत वादंग उठले. विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमार आणि पॅलेट गनच्या वापरामुळे अमित शहा यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे. हे सर्व होत असतानाच कॉकरोच जनता पार्टीचे अभिजीत दीपके यांच्याविरुद्ध विविध मार्गांनी चौकशीचे षडयंत्र सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे दीपके यांची चौकशी व्हावी आणि चौकशी होऊ नये, याबाबत दोन्ही बाजूंनी वाद-प्रतिवाद सुरू आहे. सचिन तिवारी नामक सुरतमधील एका व्यक्तीने अभिजीत दीपके यांच्या घरची परिस्थिती अत्यंत बेताची असताना ते परदेशात शिकायला कसे गेले, याची तसेच त्यांच्या आई-वडिलांची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. त्यांनी पोलिसांत गुन्हा दाखल करून चौकशीची मागणी केली आहे. सचिन तिवारी यांच्या या चौकशीच्या मागणीविरोधात दलित पॅंथर सेनेच्या वतीने इशारा देण्यात आला आहे की, आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या अभिजीत दीपके यांना तसेच त्यांच्या आई-वडिलांना या निमित्ताने काही त्रास देण्याचा प्रयत्न केला, तर ते दलित पॅंथर सेना खपवून घेणार नाही. “तुम्ही प्रस्थापितांविरुद्ध पीडीसीबीआयची चौकशी बंद का केली, याचे आधी उत्तर दिले पाहिजे. त्यानंतरच अभिजीत दीपके या सर्वसामान्य कुटुंबातील तरुणाकडे आले पाहिजे. आजकाल परदेशात शिक्षण घेण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. त्याचा फायदा घेऊन त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले आहे,” असे या दलित पॅंथर नेत्याने म्हटले आहे. याबाबत स्वतः अभिजीत दीपके यांनी म्हटले आहे की, “तुम्ही माझी डिग्री विचारत आहात, ठीक आहे. मी ती खुली करेनच; पण त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली डिग्री कोणती आहे, ते जाहीर करावे. तसेच मला जर परदेशातून फंडिंग होत असेल, तर गृह खाते तुमच्याकडे आहे. गृह विभागामार्फत माझी केव्हाही चौकशी करू शकता.” तेव्हा अभिजीत दीपके यांच्या डिग्रीचा आणि त्यांच्या शिक्षणाचा हा प्रवास आहे. त्याबाबत गृह खाते चौकशी करू शकते.

    अभिजीत दीपके यांना देण्यात आलेले पोलीस संरक्षण तातडीने काढून घेण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनचे अध्यक्ष राहुल तुमने यांनी केली आहे. त्यांना दिलेल्या पोलीस संरक्षणाच्या ड्युटीवर असलेल्या PSI अधिकाऱ्याला ज्या पद्धतीने त्यांनी अपमानित केले, ते कदापि सहन केले जाणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.  अभिजीत दीपके यांनी त्या पोलीस अधिकाऱ्याची जाहीर माफी मागावी, तसेच त्यांच्या पायावर डोके ठेवून माफी मागावी, अशी मागणी राहुल तुमने यांनी केली आहे. अन्यथा त्यांना दिलेले पोलीस संरक्षण काढून घेण्यात यावे, असेही राहुल तुमने यांनी म्हटले आहे. राहुल तुमने हे संभाजीनगरचे पोलीस कमिशनर आणि जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन अभिजीत दीपके यांचे पोलीस संरक्षण काढून घेण्याबाबत विनंती करणार आहेत. एकंदरीत काय, तर अशा प्रकारे विविध मार्गांनी अभिजीत दीपके यांना त्रास देण्यात येत आहे. त्यांच्या आई-वडिलांवर याचा विपरीत परिणाम होऊन ते काही बरे-वाईट करून घेतील, अशी भीती दलित पॅंथर सेनेतर्फे व्यक्त करण्यात आली आहे. “असे काही अघटित घडले, तर आम्ही शांत बसणार नाही,” असा इशाराही दलित पॅंथर सेनेतर्फे देण्यात आला आहे. शासनाने याची नोंद घ्यावी. केंद्र शासनाकडून अभिजीत दीपके यांना काही उपटसुंभ मंडळी नाहक त्रास देत आहेत, हेही तितकेच खरे आहे.  सद्यस्थितीत झारखंड येथे विद्यार्थ्यांचा प्रश्न मोठ्या प्रमाणात चिघळला आहे. शासनाकडून दोन वेळा संवाद साधण्याचा प्रयत्न झाला; मात्र त्याला यश आले नाही. आज १६ दिवस झाले, तरी तेथील आंदोलन संपलेले नाही. येत्या २० ऑगस्ट रोजी येथील विद्यार्थी विधान भवनाकडे कूच करणार आहेत. त्याआधी जर हा प्रश्न मिटला नाही, तर जंतर-मंतरसारखी आंदोलनाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांचे आंदोलनसुद्धा चिघळण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    लाडक्या बाप्पांचे उत्साहात आगमन!

    September 14, 2026

    जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मोर्चाची रणनीती ठरली!

    September 13, 2026

    एमपीएससी परीक्षा प्रक्रिया : विद्यार्थ्यांसमोर शासन झुकले

    September 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif