रेल्वे ट्रॅकजवळ आढळला चिमुकल्याचा मृतदेह

0

जळगाव | प्रतिनीधी

येथील शिवाजीनगरकडून ममुराबादकडे जाणाऱ्या रस्त्याजवळ रेल्वे ट्रॅकच्या बाजूला आज (दि.३०) पहाटे एका कापडमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत बालकाचा मृतदेह आढळला आहे. या मुले परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

सविस्तर वृत्त असे कि,  शहरातील छत्रपती शिवाजी नगरकडून ममुराबादकडे जाणाऱ्या रस्त्यारील रेल्वे उड्डाणपूल जवळ आज (दि.३०) पहाटे ६ वाजेच्या सुमारास रेल्वे ट्रॅकजवळ काही महिन्यांचे बाळ मृतावस्थेत आढळून आले.

हातापायाला काळा दोरा, शाल, औषधी आणि दूध पिण्याची बाटली असे साहित्य बालकाजवळ पडलेले होते. घटनेची माहिती कळताच शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. चिमुकल्याचा मृत्यू कसा झाला, त्याला कुणी फेकले, त्याचे पालक कोण?, याचा शोध आता पोलिसांना घ्यावा लागणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.