Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • महामार्ग बायपासचा अट्टाहास अखेर नडला!
    • प्रवास ग्रंथालयांचा : माहिती संग्रहालय ते आधुनिक ग्रंथालय!
    • ‘डॉल्फिन’ आणि ‘चान-होम’ चक्रीवादळांमुळे भारताला धोका
    • अशी तशी नव्हे; चक्क बसचीच केली चोरी!
    • बापरे! भटक्या श्वानाचा कहर; १३० जणांना चावला!
    • ए.आर. रहमानच्या मुलाचा मध्यरात्री भीषण अपघात
    • फुटलेल्या सहा खासदारांमध्ये चलबिचल वाढली
    • संघर्ष पेटला : झारखंडमध्ये जंतरमंतरसारखी पुनरावृत्ती
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»अपघात»बापरे! २५१ च्या स्पीडने धावणाऱ्या बीएमडब्ल्यूचा चुराडा
    अपघात

    बापरे! २५१ च्या स्पीडने धावणाऱ्या बीएमडब्ल्यूचा चुराडा

    अवयव अक्षरशः विखुरले : दोन जणांचा जागीच मृत्यू एक गंभीर
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 21, 2026No Comments796 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    बदलापुरात मुंबई-वडोदरा हायवेवर एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात बीएमडब्ल्यू कारचा अक्षरशः चक्काचूर झाला असून, दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. काल रात्रीच्या सुमारास ही बीएमडब्ल्यू कार टिटवाळ्याच्या दिशेकडून बदलापूरकडे येत होती. एरंजाडजवळ चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ही कार दुभाजकावर (डिव्हायडर) आदळून पलटी झाली.

    हा अपघात इतका भीषण होता की, मृतदेहांचे अवयव अर्धा किलोमीटरपर्यंत विखुरले गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मरण पावलेल्या व्यक्ती बदलापूर येथीलच असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. सध्या त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी दाखल झाली आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

    मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हा अपघात मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास घडला. हायवेवरून जात असताना मध्यरात्रीच्या अंधारात रस्त्याचा आणि वेगाचा अंदाज न आल्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि अलिशान BMW कार थेट डिव्हायडरला जाऊन धडकली. ही धडक इतकी भयानक होती की, संपूर्ण परिसरात मोठा आवाज झाला. BMW चा चुराडा झाला.

    सध्या सोशल मीडियावर या अपघाताचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अपघातापूर्वी गाडीचा वेग ताशी तब्बल २५१ किलोमीटर असल्याचे स्पष्ट दिसत आहे. यावरून गाडीचा वेग किती मर्यादेबाहेर होता, याचा अंदाज येतो.

    अपघात इतका भीषण होता की, महागड्या आणि सुरक्षित मानल्या जाणाऱ्या BMW कारचा अक्षरशः चुराडा झाला आहे. गाडीच्या इंजिनचे तुकडे-तुकडे झाले असून, हायवेवर जिकडे तिकडे गाडीचे अवशेष विखुरलेले पाहायला मिळत आहेत. घटनास्थळावरील कारची अवस्था आणि विदारक दृश्ये पाहून अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही.

    या भीषण अपघातामध्ये कारमधील एका पुरुषाचा आणि एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर गाडीत असलेली एक मुलगी या अपघातात गंभीररीत्या जखमी झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमी मुलीला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते आहे. याप्रकरणी पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    अशी तशी नव्हे; चक्क बसचीच केली चोरी!

    August 10, 2026

    बापरे! भटक्या श्वानाचा कहर; १३० जणांना चावला!

    August 10, 2026

    ए.आर. रहमानच्या मुलाचा मध्यरात्री भीषण अपघात

    August 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif