Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिल्लीतील इमारत कोसळली; किती विद्यार्थी दबले गेले?
    • यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला
    • यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?
    • भुसावळ राष्ट्रवादीचे ११ नगरसेवक शिवसेनेत; सावकारे गटात अस्वस्थता!
    • बापरे! मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोटाने खळबळ!
    • दिल्लीत 5 मजली इमारत कोसळली
    • महाराष्ट्रातील ‘या’ भागांमध्ये पावसाचा इशारा
    • नव्या टीमनंतर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»अपघात»आंबेनळी घाटात ९०० फूट खोल दरीत कोसळली दुचाकी
    अपघात

    आंबेनळी घाटात ९०० फूट खोल दरीत कोसळली दुचाकी

    नवरा-बायकोचा मृत्यू : घाट रस्त्यांवरील सुरक्षा मुद्दा ऐरणीवर
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 24, 2026No Comments226 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    साताऱ्यातून मोठी बातमी समोर आली आहे. आंबेनळी घाट येथे अत्यंत दुर्दैवी अपघात घडला असून, सुमारे ९०० फूट खोल दरीत कोसळून एका दांपत्याचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी आणि बचाव पथकाने रेस्क्यू ऑपरेशन करून मृतदेह बाहेर काढले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून हा अपघात नेमका कसा झाला याचे अद्यापही कारण समोर आलेले नाही.

    मिळालेल्या माहितीनुसार, सातारा जिल्ह्यातील आंबेनळी घाट येथे कुंभरोशी गावाजवळ, पोलादपूर हद्दीत रस्त्याच्या कडेला संशयास्पद स्थितीत एक मोटारसायकल आढळून आल्याने स्थानिकांनी तात्काळ पोलिसांना कळवले. त्यानंतर त्वरित शोधमोहीम सुरू करण्यात आली. घाट परिसरात अंधार, मुसळधार पाऊस आणि दाट धुके असल्यामुळे परिस्थिती अत्यंत कठीण होती.

    तरीही बचाव पथकाने दोरांच्या सहाय्याने जीवाची पर्वा न करता खोल दरीत उतरून शोधकार्य सुरू ठेवले. मात्र, रात्री उशिरा हवामान अधिक खराब झाल्याने आणि दृश्यमानता कमी झाल्यामुळे बचावकार्य काही काळासाठी थांबवावे लागले. आज सकाळी पुन्हा एकदा पोलीस, बचाव पथक आणि स्थानिक प्रशासनाने संयुक्तपणे मोहीम सुरू केली. अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सुमारे ९०० फूट खोल दरीत पुरुषाचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर आणखी सुमारे १५० फूट खाली महिलेचा मृतदेहही सापडला.

    या अपघातात मृत्यू पावलेल्यांची ओळख मोहन चव्हाण आणि जयश्री चव्हाण अशी झाली आहे. या दुर्दैवी घटनेने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, बचाव पथकाने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत धाडसाने कामगिरी पार पाडल्यामुळे त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

    स्थानिक प्रशासनानेही या मोहिमेत सहभागी सर्व यंत्रणांचे आभार मानले आहेत. या अपघातामुळे घाट रस्त्यांवरील सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विशेषतः पावसाळी वातावरणात आणि धुक्याच्या परिस्थितीत वाहन चालवताना अधिक काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला

    September 7, 2026

    यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?

    September 7, 2026

    बापरे! मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोटाने खळबळ!

    September 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif