२३ वर्षीय तरुणी फसली ५० वर्षीय प्रौढाच्या जाळ्यात…

 

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क;

एका महत्वकांक्षी असलेल्या २३ वर्षीय तरुणीला डेटिंग अॅप वापरणे चांगलाच महागात पडलं आहे. मुलगी ही राष्ट्रीय खेळाडू असून, सध्या स्पर्धा परीक्षांची तयारी करत होती. तिने एक विरंगुळा म्हणून डेटिंग अॅप (Dating APPs) डाऊनलोड केलं होत.

आपल्या प्रोफाईलशी एक प्रोफाईल मॅच होतंय हे बघून तिने फ्रेंड रिक्वेस्ट (Freind Request) स्वीकारली. समोरच्याने आपण अविवाहित असल्याचं तिला सांगून त्यांच्यात ऑनलाईन चॅटिंग (Online Chating) सुरु झाली. आवडीनिवडी जाणून घेतल्या गेल्या. फोन नंबर एकमेकांना दिले गेले. भेटीगाठी होऊ वाढल्या. 50 वर्षाच्या व्यक्तीला 23 वर्षांची ती मुलगी डेट करू लागली. त्याने त्या मुलीला लग्नाचं आमिष दाखवून तिच्याशी बऱ्याच वेळा जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. काही दिवसांनंतर तो 50 वर्षीय पुरुष विवाहित आहे, त्याला दोन मुलं आहेत आणि लग्नाचं खोटं वचन देण्यात आलं याबद्दल त्या मुलीला कळलं. आपण फसवलो गेल्याचं तिच्या लक्षात आलं, तोपर्यंत बराच उशीर झाला होता.

जसजशा टेक्नॉलॉजी येत गेल्या तसतसे अनेक फसवणुकीचे प्रकार होत आहेत. ज्यात सध्या डेटिंग ॲपचा उपयोग करून होणारे फसवणुकीचे प्रकार जास्तच ऐकायला मिळतात. या प्रकरणातही तसंच काहीसं घडलं.

खरंखुरं भासेल अशी सोशल मीडियावर किंवा ॲप वर प्रोफाईल तयार करून समोरून तुम्हाला अप्रोच केलं जातं. किंवा डेटिंग ॲपवर तुमची प्रोफाईल बघून स्वतःची प्रोफाईल आरोपी स्वतःची बनवतो. जेणेकरून तुम्हाला मिळत्या – जुळत्या प्रोफाईलचं सजेशन येईल. अशाप्रकारे तुम्हाला जाळ्यात ओढलं जातं.

डेटिंग ॲपवरून ओळख झाल्यानंतर मैत्री किंवा प्रेम इथपर्यंत जाण्याअगोदर समोरच्याची पूर्ण माहिती मिळवली पाहिजे. समोरून सांगितल्या जात आहेत त्या गोष्टींवर थेट विश्वास ठेवणं धोकादायक आहे. बऱ्याच केस अशा झाल्या आहेत की समोरची व्यक्ती अविवाहित असल्याचं सांगते, पण ती व्यक्ती विवाहित असते. सोशल मीडियावरून महिला किंवा तरुणींना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून त्यांना लग्नाचं आमिष दाखविलं जातं. त्यातून लैंगिक अत्याचार होतात. तसंच आर्थिक फसवणूक होण्याचेही प्रकार घडत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here