200 वर्षे जुने शिवमंदीर कोसळले, जखमींमध्ये पाच महिन्याच्या बाळाचा समावेश

 

नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क;

राज्यात मागच्या काही दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. त्यामुळे राज्यात अनेक भागात मोठे नुकसान झाले आहे. मागच्या 15 दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने विदर्भातील अनेक जिल्ह्यात मोठे नुकसान झाले होते. याचबरोबर दोन दिवसांपासून झालेल्या पावसाने काही लोकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. तसेच नागपूर शहरातील भालदारपूरा भागातील दोनशे वर्ष पुरातन शिव मंदिराचा काही भाग आज दि.१० पहाटे कोसळला. यात पाच जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये पाच महिन्याच्या बाळाचा समावेश आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मंदिराच्या बाजूला असलेल्या छोट्या छोट्या तीन घरांवर मंदिराचा काही भाग कोसळला. फायर ब्रिगेडने बचाव कार्य सुरू करत ६ लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढले. जखमींना रुग्णालयात भरती केले आहे.

पावसामुळे नागपुरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाने आज होणाऱ्या सर्व परीक्षा रद्द केल्या आहेत. परीक्षांचे सुधारीत वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल, असेही विद्यापीठाने कळविले आहे. तसेच शहरातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. हवामान खात्याने आज व उद्या रेड अलर्ट चा इशारा दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here