जि.प.चे गटनेते प्रभाकर आप्पा सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त कोविड सेंटरला पंधरा हजाराचा धनादेश

0

यावल:-  जिल्हा परिषदेचे गटनेते तथा यावल तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष प्रभाकर आप्पा सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी  रिकामा न खर्च न करता सेवाभावी उपक्रम राबवून आपण समाज हिताचे कार्यक्रम करावे या उद्देशांनी त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त कोवि ड सेंटरच्या ऑक्सीजन प्रणाली करिता  पंधरा हजाराचा धनादेश तालुक्याचे आमदार शिरीष  दादा चौधरी यांच्या हस्ते नायब तहसीलदार यांना देण्यात आला.

यावेळेस आमदार शिरीष  दादा चौधरी यावल नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष शशांक देशपांडे काँग्रेस इंटकचे जिल्हाध्यक्ष भगतसिंग पाटील काँग्रेसचे शहराध्यक्ष कदीर खान खरेदी-विक्री संघाचे संचालक अमोल बि रूड गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर गजेंद्र सोनार यांच्यासह इतर कार्यकर्ते या वेळेस हजर होते तसेच त्यानिमित्त यावल तालुका खरेदी विक्री संघामध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते यांनी प्रभाकर आप्पा सोनवणे यांचा छोटेखानी वाढदिवस साजरा केला यावेळी प्रभाकर आप्पा सोनवणे यांनी सांगितले की हार गुच्छ न आणता मला कुठल्या प्रकारची भेटवस्तू न आणता कोविड सेंटरला मदत करा असे आवाहन कार्यकर्त्यांना त्यांनी केले प्रभाकर आप्पा सोनवणे यांनी राबवलेल्या  उपक्रमाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.