तांदूळवाडी येथे कृषि विभाग भड़गाव मार्फत सोयाबीन बियाने उगवन क्षमता प्रात्यक्षिक

0

कजगाव ता,भड़गाव : येथून जवळ असलेल्या तांदूळवाड़ी गावात ज्या शेतकरी बांधवांना सोयबीन पेरण्याचे ठरवीले असेल त्यांनी आपल्याकड़े घरीच किवा गावातील उपलब्ध असलेल्या सोयाबीन बियाण्याची उगवन चाचणी घेवून त्यानुसार बियाने पेरनीसाठी वापरावे , शेतकऱ्यानी आपला उत्पादन खर्च कसा कमी करता  येईल याचा विचार करून खरीप 2021 पेरनीचे नियोजन करावे याबाबत मार्गदर्शन कृषी विभाग भड़गाव यांच्या कडून तांदूळवाड़ी येथे करण्यात आले.

सोयाबीन सरळ वान व स्वप रागीत पिक असल्याने दरवर्षी बदलण्याची आवश्यकता नाही मात्र पेरनी पूर्वी उगवन चाचनी घेणे आवश्क आहे , यासाठी सोयाबीन च्या प्रत्येक पोत्यातुन प्रातिनिधीक नमुना काढुण एकत्र करावा. चौकोनी गोंणपाट घेवुन ते स्वच्छ धुवुन घ्यावे ते गोंणपाट जमीनीवर पसरावे व काढलेल्या प्रातिनिधीक नमुन्यातुन सरसकट 100 दाणे 2 से.मी च्या अंतरावर 10-10 च्या ओळीत गोंणपाटावर ठेवावेत.

त्यावर चांगले पाणी शिंपडावे व गोंणपाटाची बियाण्यासकट गुंडाळी करून हळुवार पणे सावलीच्या ठिकाणी ठेवुण दयावी अशा प्रकारे नमुना तयार करून त्यावर अधुन मधुन पाणी शिंपडुन ती गुंडाळी ओली ठेवावी. 5 ते 6 दिवसानंतर गुंडाळी उघडुन चांगले कोंब आलेले दाणे वेगळे करून मोजुन घ्यावी. 100 दाण्यापैकी 70 किंवा जास्त दाणे उगवुन आले असतील तर आपले बियाणे पेरनीस योग्य आहे असे समजावे. एकरी 30 किलो या प्रमाणात बियाणे वापरावे. जर उगवण शक्ती 60 टक्के आली तर पेरणी करतांना एकरी 5 किलो बियाणे जास्त वापरावे. अशा प्रकारे घरच्या घरी सोयाबीन उगवण क्षमतेचा अदांज येतो.

हि चाचणी पेरणीच्या एक आठवडा आगोदर करवी. अशा प्रकारे प्रात्यक्षिक दाखवुन सखोल मार्गदर्शन करण्यात आले. तालुका कृषि अधिकारी श्री. बी.बी. गोर्डे यांनी सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता तपासुनच पेरणी करण्याचे आव्हान केले आहे. यावेळी सरपंच सिताराम पवार, प्रगतशिल  शेतकरी कैलास पवार, भागवत पाटील, प्रशांत पाटील, नकुल पाटील, चंद्रभान पाटील व कृषी विभागाचे कृसी पर्यवेशक ए.पी. पाटील, बिटिएम भुषण वाघ व कृषी साय्यक सचिन पाटील उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.