भुसावळात कोबिंग ऑपरेशन दरम्यान चार आरोपींवर कारवाई ; पाच समन्सची केली बजावणी

0

भुसावळ (प्रतिनिधी)- शहरात शुक्रवार रोजी रात्रीच्या सुमारास बाजारपेठ पोलिसांनी  कोबिंग ऑपरेशन केले. या कोबिंग आपरेशन दरम्यान विविध गुह्यातील चार आरोपींवर कारवाई करण्यात आली तर अन्य पाच जणांना संमन्स बजावन्यात आले. कोबिंग ऑपरेशन दरम्यान दोन हदपार आरोपी हेमंत ऊर्फ ( सोन्या ) जगदिश पैठणकर वय 27 रा.भिरुड हॉस्पिटल जवळ भुसावळ , चेतुन ऊर्फ ( गुल्या ) पोपट खडसे वय 28 रा. हनुमान नगर केळकर हॉस्पिटल जवळ भुसावळ या दोन्ही आरोपींना एक वर्षा करीता जिल्हयातुन हदपार करण्यात आले होते या दोन्ही आरोपीतांनी हद्दपारतेच्या  आदेशाचे भंग करुन भुसावळ शहरात बेकायदेशीररित्या प्रवेश करुन वावरतांना मिळुन आले म्हणुन त्या दोन्ही आरोपीवर मु.पो.अँ.क.142 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

तसेच भुसावळ शहरात वाल्मीक नगर भागात रामदेव बाबा मंदिरा जवळ  आरोपी भिमराव जानु इंगळे वय 75 हा 600 /- रुपये किंमतीची 15 लीटर गावठी हातभटटीची दारु 20 लीटरच्या प्लॉस्टीकच्या कँनमध्ये  विना परवाना कब्ज्यात बाळगून तिची चोरटी विक्री करतांना मिळुन आला म्हणुन त्यावर मु.प्रोव्ही.अँक्ट क.65 ( ई ) प्रमाणे गुन्हा दाखल केला.

तसेच भुसावळ जे.एम एफ सी कोर्ट कडील नॉन बेलेबल वॉरंट मधील आरोपी शेख मुजमील शेख शब्बीर वय 30 रा.ग्रीन पार्क भुसावळ यास अटक केली .तर5 समन्सची बजावणी करण्यात आली.  सदर कोबींग ऑपरेशनची कारवाई पोलीस अधिक्षक प्रविण मुंढे , अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी ,उपविभाग पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे,पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक  कृष्णा भोये, गणेश धुमाळ, पो.हे.कॉ.वाल्मीक सोनवणे, कृष्णा देशमुख, नेव्हील बाटली पो.ना रविंद्र बि-हाडे, रमण सुरळकर, चंद्रकांत बोदडे , समाधान पाटील, महेश चौधरी , यासिन पिंजारी,  पो.कॉ. योगेश माळी, प्रशांत परदेशी, परेश बि-हाडे, करतारसिंग परदेशी , सचिन चौधरी अश्यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.