कापूस पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी

0

मलकापुर:-नजिविडू सिडस् लिमिटेड कंपनी चे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक  एम प्रभाकरराव यांनी हर्षोउल्हासात संकरीत कापूस वाण NCS-9011 आशा चे डिजिटल प्लॅटफॉर्म द्वारे सादर केले यामध्ये मलकापूर मोताळा, नांदुरा, संग्रामपूर, जळगाव जामोद खामगाव आणि शेगाव मधील शेतकऱ्यांनी तसेच विक्रेते  बंधूंनी याचा लाभ घेतला तसेच 5000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी  सहभाग घेतला. शेतकऱ्यांना संबोधित करताना एम. प्रभाकरराव यांनी NCS-9011 आशा वानाच्या वैशिष्टावर प्रकाश टाकला. तसेच नुजु वीडू सीड्स लिमिटेड कंपनीचे नॅशनल  सेल्स मॅनेजर राजेश त्रिपाठी, व्हाईस प्रेसिडेंट अजय झोडे यांनी ही संबोधित केले. रिजनल मॅनेजर द्वारकाप्रसाद पाटील यांनी विक्रेत्यांन सोबत केक कापुन  आनंद द्विगुणित केला

संबोधित करताना त्यांनी सांगितले कि मागील काही वर्षामध्ये हवामानातील बदल,  कोरडा दुष्काळ , पाऊस, गुलाबी बोंड अळी रसशोषक किडीचे आक्रमण आणि इतर रोगामुळे शेतकऱ्यांना कापूस पीक घेण्यास मुख्य अडथळे  येत आहेत परिणाम स्वरूप शेतकऱ्याचे पीक व्यवस्थापन खर्चात वाढ होऊन उत्पादनात तसेच उत्पन्न कमी झाले आहे.

NCS-9011 आशा कमी कालावधीत येणारे संकरित वाण आहे. त्याचा कालावधी विभागानुसार 140 से 150 आहे. झाडाचा बुंधा मजबूत असून झाड आकर्षक आहे बोडांचे वजन 6 से 6.5 ग्राम असून वेचण्यास सुलभ असल्यामुळे मजूर वर्ग सुध्दा हे वान पसंत करीत आहे. पीक कमी कालावधी चे असल्यामुळे ते शेत लवकर रिकामे होते त्यामुळे शेतकरी दुसऱ्या पिकाची पेरणी वेळेवर करून दुसऱ्या पिकाचे जास्त उत्पादन घेऊ शकतात लवकर येणारे वाण असल्यामुळे गुलाबी बोंड अळीला कमी बळी पडते, तसेच हे वाण रसशोषक किडीस सहनशील असल्यामुळे या कीडीचा प्रादुर्भाव कमी होतो परिणाम स्वरूप जास्त उत्पादन होते. या कारणाने शेतकन्यांच्या खर्चात कपात होऊ नफ्यात वाढ होते

प्रभाकरराव यांनी शेतकऱ्यांना आधुनिक शेती करण्याकरीता प्रोहोत्साहित केले आणि वेळेवर रोग व कीट व्यवस्थापन करीता खत व किटकनाशक बददल माहिती दिली.

संक्षिप्त सांगायचे झाल्यास नुजिविडू सिडस लिमीटेड कंपनी चे संकरीत वाण NCS 9011 आशा मुळे शेतकऱ्यांना कमी वेळेत जास्त उत्पादन व जास्त उत्पन्न देते.

Leave A Reply

Your email address will not be published.