आता अंत्यसंस्कारासाठी ऑनलाइन मिळणार टाईम स्लॉट

0

नाशिक : कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्यांची संख्या वाढत असल्यानेअमरधाममध्ये अंत्यसंस्कारासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. हे टाळण्यासाठी नाशिक महापालिकेने आता खास ॲप तयार केले असून त्यामुळे मृत व्यक्तीच्या नातेवाईंकांना स्मशानभूमीतील ताजी स्थिती कळेलच परंतु टाईम स्लॉटदेखील निवडता येणार आहे.

आज पासून हे ॲप कार्यान्वित

करण्यात आले आहे. शिवाय महापालिकेच्या इ कनेक्ट ॲपमध्ये देखील त्याची लिंक देण्यात आली आहे. अंत्यसंस्कारासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची नावे आणि माहिती यात असून स्मशानभूमीचे ठिकाण गुगल मॅपशी जोडण्यात आल्याने त्या शोधणेही सहज शक्य होणार आहे. नासिक शहरात एकूण १७ अमरधाम असून त्यात ८० बेड आहेत. त्यातील सर्व माहिती उपलब्ध होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.