जिल्ह्यात आज ८५८ नवे रुग्ण आढळले ; १६ जणांचा मृत्यू

0

जळगाव । जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत कोरोनाचा संसर्ग वाढत नसून आकडा स्थिर आहे. मे महिन्याच्या पहिल्या दिवसापासून नव्या रुग्णांचा आकडा हजाराच्या आत आहे. आज सलग सहाव्या दिवशी नव्या बाधित रुग्णांपेक्षा बरे होणारे रुग्ण अधिक आहे. आज दिवसभरात ८५८ रुग्ण आढळून आले. तर आजचं १ हजार ०५ रुग्ण बरे झाले आहे. दरम्यान, आज १६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आज गुरुवारी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात आजपर्यंत बाधित रुग्णांचा आकडा १ लाख २७ हजार ३११ वर गेला आहे. त्यापैकी १ लाख १५ हजार ४७४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. आज १६  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकूण मृताचा आकडा २२८८ वर गेला आहे. सध्या जिल्ह्यात ९ हजार ५४९ रुग्णांवर उपचार सुरु आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९०.७० टक्क्यांवर पोहचले आहे.

असे आढळले रुग्ण

जळगाव शहर १३४, जळगाव ग्रामीण ३५, भुसावळ १२०, अमळनेर २५, चोपडा ४१, पाचोरा ७५, भडगाव ०९, धरणगाव २२, यावल ३२, एरंडोल २३, जामनेर २१, रावेर ३२, पारोळा २३, चाळीसगाव १०७, मुक्ताईनगर ६५, बोदवड ४७, अन्य जिल्ह्यातील ११ असे एकूण ८५८ नवीन रुग्ण आढळून आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.