नियोजना अभावी लसीकरण केंद्रावर गोंधळ ; अपूर्ण माहितीमुळे नागरिकांचा संताप

0

पारोळा -(अशोककुमार लालवाणी) : पारोळा येथे मागील पाच  दिवसाच्या प्रतिक्षे नंतर २०० लसी चे डोस प्राप्त झाल्याने लसी करणास सुरुवात झाली. याबाबत अधिक माहिती अशी कि पारोळा येथे पाच दिवासां नंतर आज पारोळा येथिल नविन केंद्र  एन ई एस गर्ल हाॅयस्कुल येथे साकाळी १०,३०,च्या सुमारास लसी करणास सुरुवात करण्यात आली,साकाळी ६ वाजे पासुन लस घेण्यासाठी नागरिकांच्या मोठ मोठ्या रांगा लागल्या होत्या नियोजना अभावी कुठे ही सोशल डिस्टंन पाडले जात नव्हते, अनेक लोक एकमेंकाना चिटकुन उभे असल्याने  सोशल डिस्टन्ट चा पुर्ण फज्जा उठाल्या चे चित्र पाहायला मिळाले.

तर अपुर्ण माहिती  मुळे ही गोंधळ निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले सकाळी १८ पासुन पुढील सर्वाना लस देण्याचे जाहीर करण्यात आले नंतर ४५ वर्षा पुढील लोकाना लस देण्याचे जाहीर केले तर दुपारी १२ वा,नंतर फक्त दुसरा डोस दिला जाणार असल्याचे सांगण्यात येत होते लसी करणा ठिकाणी कोणते ही नियोजन आढळुन येत नव्हते तर अनेक नागरिकांना वेळो वेळी वेगवेगळी माहिती दिली जात असल्याने तास न तास उन्हात ताळकळत उभे राहुन मागारी फिरल्याने मनस्ताप सहन करावा लागला , आज कोव्हीशिल्ड  या लसी चे २०० डोस प्राप्त झाले होते,तर लस घेण्यासाठी हजारो नागरिकांनी गर्दी केली होती,तसेच लसीकरणाला खुप वेळ लागत असल्याने लसीकरण अतिशय संथ गतीने होत होते दुपारी बारा वाजे पर्यंत फक्त ५० डोस दिल्याची माहिती मिळाली, लसीकरणा ठिकाणी तहसिलदार अनिल गंवादे,तालुका आरोग्य अधिकारी प्रांजली पाटील,वैद्यकिय अधिकारी योगेश सांळुखे,पारोळा नगर पालिका मुख्यधिकारी  ज्योती भगत यांनी भेट देऊन परिस्थिची पाहणी केली, व अडचणी जाणुन घेतल्या.

नगर पालिके कडुन नियोजन सुरु–मुख्यधिकारी ज्योती भगत

लसीकरण केंद्राला भेट दिल्या नंतर पारोळा नगर पालिके च्या मुख्याधिकारी श्रीमती ज्योती भगत यांनी दैनिक लोकशाही चे प्रतिनिधी अशोक लालवाणी यांच्या  बोलताना सांगीतले कि आज प्रथम दिवस असल्याने थोड्या अडचणी आल्या परंतु उद्या पासुन सर्व नियोजन करुन च लसीकरण होणार आहे,यात नगर पालिके मार्फत पुर्ण बॅरेकिट लावले जातील तसेच लसीकरण केंद्रावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नगर पालिके मार्फत केली जाणार लस घेण्या आगोदर नगर पालिके मार्फत अॅन्टीजन टेस्ट केली जाणार आहे,तसेच सोशल डिस्टन्स साठी ही पारोळा पोलिसा कडुन काही मदत मागितली जाणार असल्याची माहिती पारोळा मुख्यधिकारी ज्योती भगत यांनी दिली,तर आज या केंद्रावर नियोजना साठी नगर पालिकेचे कर्मचारी करनिरिक्षक संदिप सांळुखे, पंकज महाजन किरण कंडारे,न,पा,चे इतर कर्मचारी तर  लस देण्या कामी वैद्यकिय अधिकारी  योगेश सांळुखे यांच्या मार्गदर्शना खाली परिचारिका राखी बडगुजर,राजु वानखेडे तसेच कुटीर रुग्णालयातील इतर कर्मचार्यानी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.