कासोदा येथील प्राथमिक.आरोग्य केंद्रातील परिचारिका शोभा पाटील यांच्या सत्कार

0

कासोदा ता ,एरंडोल (प्रतिनिधी) : कासोदा येथील  प्राथमिक आरोग्य केंद्रातील राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित असलेल्या व अगदी नावाप्रमाणे शोभणारे व्यक्तिमत्व असलेल्या, परिचारिका शोभा पाटील यांचे व्हॅक्सीनेशन कामात सर्वोत्कृष्ट काम करून गावाचे नाव संपूर्ण जिल्ह्यात उंच केल्यामुळे बुलडाणा अर्बनने त्या कामाची दखल घेत जळगावचे विभागीय व्यवस्थापक रमेश पवार, कासोदा शाखा व्यवस्थापक अनिल सोळंके, तरुण भारतचे कासोदा प्रतिनिधी केदारनाथ सोमाणी यांनी त्यांचा साडी, शाल व पुष्पगुच्छ देवून सन्मान व सत्कार केला.

तसेच त्यांना कोविड-१९ चे कामात सतत अहोरात्र  मदत कार्य करणार्‍या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राचे आधिकारी,कर्मचारी यांचेही अभिनंदन केले.

शोभा पाटील या लासिकरणासाठी नागरिकांचा वेळ वाया जावू नये म्हणून एक दोन दिवस आधी मोबाईलवरून त्यांची नोंदणी करून घेतात व ज्या दिवशी त्यांचा नंबर येईल त्या दिवशी सकाळी स्वतःचे मोबाईलवरून त्यांना फोन करतात एवढेच नाही तर त्यांचा नंबर किती वाजता लागेल असा अंदाजे वेळ सुद्धा सांगतात त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांचा जास्त वेळ देखील वाया जात नाही.

असे आगळे वेगळे काम त्या करत असून अहोरात्र प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी स्वतःला वाहून घेत असतात. त्यासाठी त्यांना तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ फिरोज शेख, वैद्यकीय अधिकारी डॉ पृथ्वीराज वाघ मेडिकल ऑफिसर डॉक्टर शेख मॅडम इतर  सहकारी कर्मचारी हे मोलाचे सहकार्य करत असतात.

Leave A Reply

Your email address will not be published.