पाचोऱ्यात एसबीआयचे एटीएम मशिन पळवून नेण्याचा प्रयत्न फसला

0

पाचोरा (प्रतिनिधी) : शहरातील भडगाव रोड वरील स्टेट बँकेचे एटीएम मंगळवारी रात्री १.३०  वाजेच्या सुमारास एटीएम च्या समोरील काच चोरट्यांनी फोडल्याचा आवाज ऐकून आशीर्वाद प्लाझाचे  शिपाई अल्पेश बापू तावडे, याने मालक मुकुंद बिल्दीकर यांना आरडा ओरडा करून सांगितले मुकुंद बिल्दीकर यांनी तातडीने खाली येऊनव लागलीच पोलीस हवालदार राहुल बेहेरे यांना त्याबाबत कळवले.

त्या आधारे बेहरे यांनी पोलीस हवालदार किरण पाटील यांच्याशी संपर्क साधला दोघे स्टेट बँके जवळ पोहोचले तोपर्यंत चोरटे पसार झाले. दोघंही पोलीस कर्मचाऱ्यांनी भडगाव रोड, जारगाव चौफुली, जळगाव रोड, जामनेर रोड अक्षरशः पिंजून काढला. भडगाव रोड भागात पीक अप व्हॅन भरधाव जात असल्याचा संशय आल्याने राहुल बेहरे यांनी गाडीचा पाठलाग सुरू केला. ते पिकअप व्हॅन चालकाच्या लक्षात आल्याने त्याने पांडव नगरीच्या रस्त्याने गाडी वळवली व गाडी मागे असलेल्या राहुल बेहरे यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. गाडी अंगावर आणली व पुन्हा पलायन करण्याचा प्रयत्न केला. अशाही परिस्थितीत न घाबरता राहुल बेहरे यांनी गाडीचा पाठलाग केल्याने चोरट्यांनी सदरची गाडी ही भट्टगाव रस्त्याला लावली पुढे रस्ता नसल्याने गाडी पिकप व्हॅन सोडून चोरटे पसार झाले.

या गाडीत जाड दोरखंड, लोखंडी अवजारे असून ए.टी.एम. मशिन गाडीत टाकून नेण्याचा त्यांचा मानस असावा असा संशय आहे. भट्टगांव शिवारात गाडीतील साहित्याच्या आधारे श्वान पथकास पाचारण करून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. मुकुंद बिल्दीकर यांची सजगता व राहुल बेहरे, किरण पाटील यांच्या धाडसाचे कौतुक होत आहे.

 

वाहनाचा नंबर प्लेट कागद चिकटवून झाकण्याचा प्रयत्न

पाचोरा येथील भडगाव रोडवरील एस बी आयचे ए. टी. एम. मशिन पळवून नेण्यासाठी पी कप आयसर वाहनावर एम. एच. ०६ ऐ. जी. १०४१ हा नंबर असून हा क्रमांक कागद चिकटवून झाकण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र पोलिसांनी हे वाहन ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आनले आहे. घटनेचा प्रकरणी मुकुंद बिल्दीकर यांचे शिपाई अल्पेश बापू तावडे याने पाचोरा पोलीस ठाण्यात तीन संशयित व अनोळखी सुमारे २५ ते ३० वयाच्या इसमाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा तपास पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील हे करीत आहेत. संशयित आरोपींच्या अटकेसाठी एक पथक तयार करण्यात आले आहे. आरोपींना लवकरच ताब्यात घेतले जाईल अशी माहिती पोलिस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांनी दिली. घटनास्थळी सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय मोरे, उपनिरीक्षक दत्तात्रय नलावडे, विकास पाटील यांनी पाहनी केली. व स्वान पथकाला पाचारण करण्यात आले आहे.

ए. टी. एम. मशिन पळविण्याचा प्रयत्न फसला मात्र वस्तूंची केली मोडतोड

पाचोरा येथील भडगाव रोडवरील एस बी आयचे ए. टी. एम. मशिन पळवून नेण्यासाठी तीन संशयित वाहन घेऊन आले होते. त्यांचा ए. टी. एम. मधून पैशाची चोरी न करणा थेट मशिनच पळून नेण्याचा प्रयत्न होता. मशिन चोरण्यासाठी चोरट्यांनी मशिनच्या वायरी तोडून बाहेरील दरवाचा व सी. सी. टी. व्ही. कॅमेरा ची तोडफोड आणि काचांची तोडफोड करण्यात सुमारे १ हजार ५०० रुपयांचे  नुकसान केले. मात्र शिपयच्या लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला, शहरातील अनेक वेळा अनेक ए. टी. एम. मशिन फोडून चोऱ्या झाल्य आहेत,असे असतांना या ठिकाणी बॅंकेने वाचमन ठेवण्यची तसबीस घेतलेली नाही. या बाबत नागरीकांकडून आचर्य व्यक्त केले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.