दिलासादायक : जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशी बरे होणारे रुग्ण अधिक

0

जळगाव प्रतिनिधी। जळगाव जिल्ह्यात एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून स्थिर असलेला कोरोनाचा आलेख मे महिन्यात काही प्रमाणात उतरताना दिसत आहे. आज सलग पाचव्या दिवशी नव्या रुग्णांपेक्षा बरे होणारे अधिक नोंदले गेले. आज दिवसभरात ९९९ नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. तर आजच १ हजार ३७ रुग्ण बरे झाले आहे. दरम्यान, आज १८ जणांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आजपर्यंत बाधित रुग्णांची एकूण संख्या  १ लाख २६ हजार ४५३ वर गेली आहे. त्यापैकी १ लाख १४ हजार ४६९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.  आज १८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकूण मृताचा आकडा २२७२ वर गेला आहे. जिल्ह्यात सध्या ९ हजार ७१२ रुग्णांवर उपचार सुरु असून जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९०.५२ टक्क्यांवर पोहचले  आहे.

आज जळगाव शहर १६०, जळगाव ग्रामीण ३२, भुसावळ १३६, अमळनेर १४७, चोपडा १५, पाचोरा ६०, भडगाव २५, धरणगाव १७, यावल २६, एरंडोल ६०, जामनेर ४९, रावेर ५९, पारोळा ३२, चाळीसगाव ८२, मुक्ताईनगर ६१, बोदवड २०, अन्य जिल्ह्यातील १८.

 

Leave A Reply

Your email address will not be published.