आ.अनिल पाटलांच्या प्रयत्नाने मतदारसंघाची कोरोना काळातही विकासात्मक वाटचाल

0

अमळनेर (प्रतिनिधी) – गेल्या वर्षी मार्चपासून कोरोना महामारीत आमदार अनिल पाटील आपले अमूल्य योगदान देत असताना यादरम्यान विकासकांमांचा पाठपुरावा देखील त्यांनी जोमाने सुरू ठेवल्याने त्यांची विकासात्मक वाटचाल देखील यशस्वी होत आहे, अमळनेर मतदारसंघातील ग्रामिण भागात तब्बल पावणे पाच कोटी(448.71 लक्ष) निधीतून विविध विकास कामांना त्यांनी मंजुरी मिळविली आहे.

सदर निधीतून ग्रामिण भागात रस्ते काँक्रीटीकरण व पेव्हर ब्लॉक, सभामंडप, ग्रामपंचायत इमारत,धोबीघाट,प्रवेशद्वार, स्मशानभूमी,सांत्वन शेड,चौक सुशोभीकरण अशी भरीव स्वरूपाची विकासकामे मार्गी लागणार आहेत.सदर विकास कामे मंजूर केल्याने आमदार पाटील यांचे ग्रामिण जनतेत कौतुक होत आहे.दरम्यान टप्प्याटप्प्याने मतदारसंघातील प्रत्येक गावातील विकासाचा राहिलेला बॅकलॉग भरून काढण्याचा आपला प्रयत्न असून कोरोना सारखी कितीही संकटे आलीत तरी या संकटाचा मुकाबला करून विकासाची वाटचाल सुरूच राहील आणि यात सर्वानाच न्याय देण्याचा प्रयत्न राहील अशी ग्वाही आमदारांनी दिली आहे.

या गावांना होणार विकासकामे

अमळनेर तालुक्यातील पिळोदे येथे भवानी चौक कॉक्रीटीकरण करणे.– 3.29 लाख, पिंपळे खु येथे स्मशानभुमी मध्ये रस्ता कॉक्रीटीकरण करणे– 3.29, पिंपळे खु .येथे महिला धोबीघाट बांधकाम करणे– 3.29, पारोळा तालुक्यातील मोहाडी येथे रस्ता कॉक्रीटीकरण करणे– 3.29, दहिगाव येथे रस्ता कॉक्रीटीकरण करणे–3.29,  शेवगे बु. येथे खंडेराव महाराज मंदिरा लगत पेवर ब्लॉक व कॉक्रीटीकरण करणे 3.29, चिखलोड येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे 3.29,  दळवेल येथे पेव्हर ब्लॉक व कॉक्रीटीकरण करणे- 3.29, जानवे येथे प्रवेशव्दार बांधकाम करणे- 6.00, मंगरूळ येथे शनीमंदिर सभामंडप बांधकाम करणे 10.00, वासरे येथे प्रवेशव्दार बांधकाम बांधणे- 6.00, लोणपंचम येथे प्रवेशव्दार बांधकाम बांधणे- 6.00, धार येथे अल्पसंखकासाठी सामाजिक सभागृह बांधकाम करणे- 7.00, कामतवाडी येथे सभामंडप बांधणे- 7.00, गडखांब येथे नवीन स्मशानभुमी बांधकाम करणे- 7.00, मठगव्हाण येथे रस्ता कॉक्रीटीकरण करणे- 5.00, पारोळा तालूक्यातील वडगाव येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे- 5.00, अमळनेर तालुक्यातील खर्दे येथे स्मशानभनी बांधकाम करणे- 7.00, वावडे येथे ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम करणे- 13.00,  ढेकुसिम येथे ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम करणे- 14.00, अमळनेर तालुक्यातील सबगव्हाण येथे रस्ता कॉक्रीटीकरण करणे- 8.00, भरवस येथे सांत्वन शेड व पेव्हर ब्लॉक बांधकाम करणे- 7.00, चौबारी येथे सरंक्षण भिंत बांधकाम करणे- 8.00, आर्डी येथे कॉक्रीटीकरण करणे- 5.00, जवखेडा येथे स्मशानभूमी, पेव्हर ब्लॉक, सांत्वन शेड, बांधकाम करणे- 13.00, कन्हेरे येथे ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम करणे-14.00, वाघोदे येथे सांत्वन शेड बांधकाम करणे- 6.00, लोण बु. येथे ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम करणे- 14.00, फाफोरे बु. येथे संरक्षण भिंत बांधकाम करणे-7.00, आंचलवाडी येथे आगमाता चौक पेव्हर ब्लॉक व रस्ता कॉक्रीटीकरण करणे- 5.00, मारवड येथे स्मशानभुमी पेव्हर ब्लॉक व सांत्वन शेड बांधकाम करणे- 13.00, मालपुर येथे ग्रामपंचायत कार्यालय समोर पेव्हर ब्लॉक बसविणे- 5.00, अंतुर्ली आदिवासी वस्तीत सामाजिक सभागृह बांधणे- 7.00, शहापुर येथे सभामंडप बांधकाम करणे- 8.39, पाडळसरे येथे प्रवेशव्दार बांधकाम बांधणे-6.00, टाकरखेडा येथे सभामंडप बांधकाम करणे- 10.00, रढावण येथे सामाजिक सभागृह बांधकाम करणे- 7.00, रुंधाटी येथे स्मशानभुमी बांधकाम करणे- 7.00, खेडी व्यवहारदळे येथे सभामंडप बांधकाम करणे- 7.00, कंडारी येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे- 5.00, ढेकू खु. येथे स्मशानभुमी पेव्हर ब्लॉक व सांत्वन शेड बांधकाम करणे- 13.00,  दापोरी बु. येथे पीरबाबा रस्ता काँक्रीटीकरण करणे-5.00,  हेडावे रस्ता काँक्रीटीकरण करणे- 5.00, हिंगोणे खु .प्र.ज.येथे पेव्हर ब्लॉक, संरक्षण भिंत बांधकाम करणे-20.00,  पळासदळे येथे प्रवेशव्दार बांधकाम बांधणे-6.00, पातोंडा येथे सभामंडप बांधकाम करणे-7.00, पिळादे येथे आदीवासी वस्तीत सामाजिक सभागृह बांधकाम करणे-5.00,  गांधली येथे रस्ता कॉक्रीटीकरण करणे-5.00, पिंगळवाड येथे स्मशानभुमीकडे जाणारा रस्ता- 5.00, हिंगोणे सिम येथे देवमढी बांधकाम करणे-5.00, पारोळा तालुक्यातील भिलाली येथे रस्ता कॉक्रीटीकरण करणे- 7.00,  इंधवे येथे ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम करणे- 14.00, कंकराज येथे गोरक्षनाथ मंदिरा लगत पेव्हर ब्लॉक व सभामंडप बांधकाम करणे- 7.00,  सबगव्हान प्र.ज. दगडी येथे स्मशानभुमी, तारकंपाउंड बांधकाम करणे- 7.00, हिरापूर येथे स्मशानभूमी बांधकाम करणे-7.00, हिवरखेडा तांडा येथे रामदेवजी बाबा मंदिरा लगत पेव्हर ब्लॉक व सभामंडप बांधकाम करणे- 7.00, हिवरखेडा येथे स्मशानभुमी बांधकाम करणे- 7.00,  दबापिंप्री येथे दत्तमंदिरा लगत पेव्हर ब्लॉक व सभामंडप बांधकाम करणे 9.00, होळपिंप्री येथे रस्ता कॉक्रीटीकरण करणे-5.00,  कोळपिंप्री येथे रस्ता कॉक्रीटीकरण करणे- 7.00, पारोळा तालुक्यातील सबगव्हाण खु. येथे सभामंडप बांधकाम करणे- 7.00, दळवेल तांडा येथे सभामंडप बांधकाम करणे- 7.00 आदी विकासकामांचा समावेश आहे.प्रत्येक गावातील निधीची रक्कम ही लाखात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.