रामगड येथे पत्त्यांचा डाव उधळला ; 1 लाख 7 हजाराचा मुद्देमाल हस्तगत

0

मुक्ताईनगर : मुक्ताईनगर तालुक्यातील बुऱ्हाणपूर रोडवरील  अंतुर्ली दुरक्षेत्र अंतर्गत रामगड शिवारात केळीच्या बागेचा सहारा घेत पत्त्याचा रंगलेला डाव मुक्ताईनगर पोलिसांच्या पथकाने शनिवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास उधळून लावला़ यात 1 लाख 7 हजार 40 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 7 जणांच्या रंगलेल्या डावातून 6 जणांना पसार होण्यात यश आले तर एकास  अटक करण्यात आली़ आहे.

रामगड शिवारात केळीच्या बागेत आडोश्याला मोठ्या अवैध उलाढालीचा लाखो रुपये लावून पत्त्यांचा डाव सुरु असल्याची गुप्त माहिती  पोलीस निरीक्षक रामकृष्ण पवार यांना मिळाली़ माहिती मिळताच मुक्ताईनगर पोलिसांच्या पथकाने सोमवारी  दि.3 मे 2021 रोजी सायं साडेपाच वाजेच्या सुमारास छापा टाकला़ या ठिकाणी सहा जणांचा डाव रंगलेला होता. परंतु पोलिसांनी धाड टाकताच केळीच्या बागातून सैरा वैरा पळून जाण्यास पाच जणांना यश आले तर पोलिसांनी शेख हमीद शेख सलीम (शिकारपुरा, बुऱ्हाणपूर), या संशयितांस रंगेहाथ अटक केली आहे. त्यांच्याजवळून 730 रुपये रोख, 5 महागडे, 5 दुचाकी यासह सट्टा जुगाराचे साहित्य असा एकूण 1 लाख 7 हजार 40 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़.

यांच्या पथकाने केली कारवाई 

पोलीस निरीक्षक रामकृष्ण पवार यांच्यासह पोलीस कर्मचारी संतोष नागरे, गणेश चौधरी, गणेश मनुरे, अंतुर्ली दुरक्षेत्र चे पोलीस कर्मचारी यांनी ही कारवाई केली़. तपास हवालदार गजमल पाटील करीत आहे

पळून जाणारे 5 जुगारी मुक्ताईनगर राजकारणी चर्चेला उत 

दरम्यान, येथे रंगलेल्या डावात मुक्ताईनगर चे राजकारणी होते.पोलीस येताच केळी बागा मार्गे त्यांनी पोबारा केला असल्याची चर्चा असून त्यांच्या पाचही मोटार सायकली मात्र पोलिसांच्या हाती लागलेल्या असून त्या जप्त करण्यात आलेल्या आहेत.व अटक करण्यात आलेल्या शेख हमीद शेख सलीम कडून उर्वरीत जुगाऱ्यांचा तपास सुरू असल्याचे पोलिसांतर्फे सांगण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.