भुसावळ विभागातर्फे स्टेशनवर फेस मास्क न घातलेल्या 863 प्रवाश्यांकडून 1,22,600 रुपये दंड वसूल

0

भुसावळ (प्रतिनिधी)-  कोविड 19 महामारीचा  संसर्ग रोखण्यासाठी फेस मास्क न  घातलेल्या 863 रेल्वे प्रवाश्यांना  दंड आकारण्यात आला आहे. भुसावळ विभागाने दिनांक 19.04.2021 ते 04.05.2021 या कालावधीत फेस मास्क नसलेल्या लोकांकडून दंड म्हणून 122600 / – इतकी रक्कम वसूल केली आहे.

प्रवाशांना दंडाच्या पावती सोबत फेस मास्क देखील विनाशुल्क देण्यात आले. रेल्वेच्या या विशेष उपक्रमामुळे प्रवाश्यांमध्ये जागरूकता निर्माण होईल आणि त्यांना साथीच्या रोगाची तीव्रताही समजेल.

कोरोना साथीच्या आजारामुळे सद्य परिस्थितीशी सामना करण्याच्या उपाययोजनांचा एक भाग म्हणून भुसावळ विभाग प्रवाशांना आवाहन करत आहे  की त्यांनी स्टेशन परिसर आणि रेल्वे प्रवासादरम्यान फेस मास्क अवश्य परिधान करावा  . स्टेशन परिसर  आणि गाड्यांमध्ये थुकू नका आणि अस्वच्छता करू नये .

स्वछता  राखण्यासाठी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे. आणि  प्रवाशांना रेल्वे परिसर आणि ट्रेन मध्ये, कोविड  १९  संबधित एसओपीचे पालन करावे.

कोरोना विषाणूचा प्रसार आणि संसर्गापासून आपण सर्वानी स्वतःचे तसेच इतरांचे संरक्षण करू या.असेही आवाहन केले आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.