भडगाव येथील नैसर्गिक मृत्यू झालेल्या शेतकऱ्याला प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना विमा अंतर्गत दोन लाख रुपये मंजूर

0

भडगाव- (सागर महाजन) भडगाव शहरातील महादेव गल्ली येथील शेतकरी भाऊसाहेब त्रंबक पाटील यांचा जानेवारी महिन्यात नैसर्गिक मृत्यू झाला होता. या बाबत भारतीय स्टेट बँक भडगाव शाखेत प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना हा विमा काढला होता. या बाबत भडगाव माजी नगराध्यक्ष -अतुल पाटील यांनी स्टेट बँकेत विमा संभदित कागदपत्रांची पूर्तता करत आज दोन लाख रुपये मयत वारस पत्नी श्रीमती अनिता पाटील यांच्या खात्यावर एन. एफ. टी. द्वारे जमा झाले असून या बाबत मंजुरी पत्र स्टेट बँक शाखा उपव्यस्थापक दीपक चव्हाण यांनी दिले.

या वेळी माजी नगराध्यक्ष- अतुल पाटील, नितेश पाटील, लाला परदेशी, सुमीत जाधव, सागर पाटील, हर्षल पाटील, चेतन महाजन, शुभम महाजन,प्रशांत महाजन, विक्की देसले,शुभम देसले,ग्यानबा सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.