अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना संक्रमणाचे पसरले लोण ; गावेच्या गावे होत आहे हॉटस्पॉट

0

अमरावती (प्रतिनिधी) : अमरावती जिल्ह्यातील कोरोनांच्या संक्रमणाची परिस्थिती भयंकर होत चालली असून गावेच्या गावे कोरोणाचे हॉटस्पॉट होत असल्याने प्रशासनासमोर कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याची आवाहन झाले आहे .

फेब्रुवारी महिन्यात अमरावतीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरुवात झाल्यानंतर 28 फेब्रुवारी पासून अमरावती जिल्ह्यात लॉकडाऊन सुरू आहे . तरीही अमरावती जिल्ह्यातील रुग्ण संखेत अद्यापही  घट न होता वाढत चाललेली आहे. कोरोणाच्या संक्रमणाचे जाळे हे जिल्ह्यातील ग्रामीण भागात झपाट्याने पसरत चालले असून . जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील गावे कोरोणा संक्रमणाच्या वेढ्यात येत आहे .अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेल्या कोरोना बाधितांची संख्याही 69 हजार 727 इतकी झालेली असून. मृत्यू संख्या ही एक हजाराच्या वर पोहोचलेली आहे .जिल्ह्यात आतापर्यंत आठ हजार 961 ऍक्टिव्ह रुग्ण असून. त्यामध्ये सर्वाधिक कोरोना संक्रमित रुग्ण हे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आहेत. एकूण रुग्ण संख्या पैकी 5686 रुग्णांवर ग्रुह विलगीकरणात उपचार करण्यात येत आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये सोशल डिस्टंसिंग बाबत असलेली उदासीनता. व लाॅकडाउनच्या निर्बंधाची होणारी पायमल्ली यामुळे कोरोना चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे .त्यासह गावातील लग्न कार्य, वाढदिवस ,अशा विविध कार्यक्रमाला गावकर्यांचीहोणारी गर्दी देखील कोरोणाच्या वाढत्या प्रकोपाचे कारण ठरत आहे . अमरावती जिल्ह्यातील धारणी, मोर्शी, वरुड ,अंजनगाव सुर्जी, तिवसा, दर्यापूर ,अचलपूर, चांदूर बाजार , नांदगाव खंडेश्वर ,चांदुर रेल्वे , धामणगाव रेल्वे , आदी तालुक्यातील अनेक गावांमध्ये कोरोनाविषाणू च्या संक्रमणाने आपले पाय पसरले असून . जिल्ह्यातील कोविंड हॉस्पिटल व रुग्णालयात ग्रामीण भागातीलच कोरोना बाधित मोठ्या संख्येने उपचार घेत आहे. तर अमरावती महानगरपालिकेच्या हद्दीतील 1229 कोरोना बाधितांवर उपचार करण्यात येत आहे .शहरी भागाच्या तुलनेत जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस नवीन कोरोणाबाधितांची संख्या सारखी वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाची झोप उडाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.