आम्हाला का दारू विक्रीचे परवाने दिले आहे की काय??

0

चिखली(प्रशांत पाटील) : रयत क्रांती संघटनेचे विदर्भाध्यक्ष प्रशांत ढोरे पाटील यांनी केमिस्ट व पत्रकार बांधव हे देखील कोरोना काळात फ्रंट लाईन वर काम करत असल्याने त्यांच्यासाठी देखील आरक्षित साठा उपलब्ध ठेवावा अशी मागणी केली आहे व जर कोव्हिडं   हॉस्पिटल व्यतिरिक्त मेडिकलला रेमडिसिव्हीयर इंजेक्शन उपलब्ध करू देत नसतील तर काय आम्हाला दारू विक्रीचे परवाने दिले की काय असा संतप्त सवाल अन्न व औषध प्रशासनाचे आधिकारी यांना प्रशांत पाटील यांनी केला आहे,

सर्वत्र कोरोनाचे तांडव सुरू असतांना केमिस्ट बांधव व पत्रकार बांधव जिवाची पर्वा न करता घरादाराचा बायका मुलांचा विचार न करता दिवस रात्र रुघ्नसेवा करत आहेत.

सध्याच्या परिस्थितीत महसूल विभाग असेल आरोग्य विभाग असेल पोलीस प्रशिक्षण असेल त्यांना जसा रेमडिसिव्हीयर इंजेक्शनचा 10%आरक्षित कोठा ठेवलेला आहे  त्याच प्रमाणे एक तर त्यात पत्रकार व केमिस्ट यांचा समावेश करावा किंवा 5% स्वतंत्र अतिरिक्त कोठा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केमिस्ट व पत्रकार बांधवांकडून होत आहे,

जटिल कायदे समोर करून अन्न व औषध प्रशासन आधिकारी कोव्हिडं व्यतिरिक्त अन्य मेडीकल धारकांना मिळत असलेला इंजेक्शनचा पुरवठा खंडित केलेला असल्याने सहज उपलब्ध करू शकणाऱ्या मेडीकल धारकांची आडवणून न करता त्यांच्या खरेदीत आडकाठी न आणता त्यांना सहकार्य करावे, अन्न व औषधी प्रशासन कार्यालया समोर झालेल्या आंदोलनादरम्यान शाब्दिक बाचाबाची दरम्यान प्रशांत पाटील यांनी अधिकाऱ्यांना जर आम्ही इंजेक्शन ठेऊ शकत नाही तर तुम्ही का आम्हाला दारू विक्रीचे परवाने दिले की काय असा संतप्त सवाल केला असता आधिकारी पुर्णतः निरुतरीत झाले.

कोण्या केमिस्ट च्या डोळ्यासमोर जर इंजेक्शन अभावी कोणता ही रुघ्न तडफडून मरत असेल तर आपण या व्यवसायात असून ही काही  करू शकत नसल्याचे जे शल्य मनाला टोचत आहे त्याची कल्पना ही न केलेली बरी म्हणून एक तर जे मेडीकल धारक इंजेक्शन उपलब्ध करू शकत असतील त्यांना सहकार्य करा अन्यथा आमचे औषधी विक्रीचे परवानेच रद्ध करा असे प्रशांत पाटील यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.