बुलढाणा जिल्ह्यात तीन दिवसांपासून एकही रेमडिसिव्हीयर इंजेक्शन उपलब्ध नाही

0

तुटवड्यास मेडीकल धारकांवर प्रशासन दाखवत असलेला कायद्याचा धाकच जबाबदार

रेमडिसिव्हीयर इंजेक्शन अभावी रुघ्नांचे स्कोर पोहचताहेत 0 वरून 25 पर्यंत

चिखली (प्रतिनिधी) – बुलढाणा जिल्ह्यात गेल्या तीन दिवसात एकही रेमडिसिव्हीयर इंजेक्शन उपलब्ध झालेलं नाही याला पुर्णपणे प्रशासनाचा अति हस्तक्षेप,खरेदी विक्री संदर्भात असलेली जिल्हा बंदी व  प्रशासनाने मेडीकल धारकांना दाखवलेली कायद्याची भीती व त्या भीतीपोटी बऱ्याच मेडीकल धारकांनी नाईलाजाने इंजेक्शन न बोलावण्याचा घेतलेला स्वयंघोषित पवित्रा व त्यातच एकमेव कर्तव्यदक्ष असलेले आधिकारी यांच्या अनुपस्थितीमुळे  इतर आधिकारी व कर्मचारी यांचा नियोजनाविषयी होत असलेला गोंधळ याला सर्वस्वी जबाबदार असल्याचे रयत क्रांती संघटनेचे विदर्भाध्यक्ष प्रशांत पाटील यांनी म्हटले आहे,

सर्वत्र कोरोना रुघ्नांमध्ये झपाट्याने वाढ होत असतांना रेमडिसिव्हीयर इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा त्यातच अन्न व औषध प्रशासन करत असलेली दादागिरी यामुळे ज्या मेडीकल धारकांनी हेट्रो कँम्पनी कडे इंजेक्शन साठी ऍडव्हान्स स्वरूपात पेमेंट पाठवले असता त्यांना आलेले इंजेक्शन त्यांच्या मेडीकल मार्फत इतर रुगणांना ही पुरवठा होऊ शकतो परंतु प्रशासनाला इंजेक्शन पुरवठ्यासंदर्भात कुठलीही उपाययोजना न करता किंवा केमिस्ट संघटनेचे कुठलेही सहकार्य न घेता परस्पर दादागिरी ने कायद्याचा धाक दाखवून जसे की त्या केमिस्टनी इंजेक्शन कुठे तरी डाका पाडून आणलेकी काय अश्या स्वरूपात केमिस्ट बांधवांना वागणूक दिल्या जात असल्याने त्यांनी कंटाळून जवळ जवळ इंजेक्शन बोलवणेच बंद केले आहे परिणामी जिल्ह्यात तीन दिवसात एकही इंजेक्शन उपलब्ध होऊ शकलेले नाही

रेमडिसिव्हीयर इंजेक्शन प्रमाणेच आता एकटेमरा इंजेक्शनची देखील मागणी मोठ्या प्रमाणात होत असताना  चिखली येथील रुद्राक्ष मेडिकोज द्वारे रुगन्नाना ते इंजेक्शन  ना नफा ना तोटा या तत्वावर 33000 मध्ये उपलब्ध करून देण्यास तयार असतांना देखील अन्न व औषध प्रशासन आधिकारी काही विशिष्ट मेडीकललाच सदर इंजेक्शन  देण्याचे एजन्सीधारकांना भाग पाडत आहेत व ते इंजेक्शन त्या रुघ्नांना 41000 रुपयात घेण्यास भाग पाडत आहेत व बऱ्याच ठिकाणी चढ्या भावात देखील इंजेक्शनची विक्री करत आहेत दिवसा ढवळ्या रुघ्नांची एका इंजेक्शन वर 8000 ची होत असलेली लूट थांबवण्यासाठी व इतर उपाययोजनांसाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयासमोर आंदोलन केले होते परंतु त्या अधिकाऱ्यांनी तात्पुरती वेळ मारून नेली व आजरोजी तर एकमेव कर्तव्यदक्ष  अधिकारी गजानन घिरके हे आजारी असल्याने सुट्टीवर गेल्याने तर सर्वच नियोजन कोलमंडलेले  दिसत आहे तरी अन्न व औषध प्रशासनाने  दादागिरी न करता केमिस्ट संघटनेचे सहकार्य घेतल्यास इंजेक्शनचे वितरण योग्य प्रकारे होऊ शकेल असे मत प्रशांत पाटील यांनी व्यक्त केलं

 

बऱ्याच ठिकानी रुगणांना इंजेक्शन उपलब्द्ध होत नसल्याने  ज्यांचा स्कोर 1,2 चा होता आज रोजी त्यांचा स्कोर 18,20 वर पोहचत आहे त्यामुळे प्रशासनाने जटिल कायदे बाजूला ठेऊन जे मेडीकल धारक जिल्ह्या बाहेरून इंजेक्शन उपलब्ध करू शकत असतील त्यांची अडवणूक करू नये व जिल्ह्याबाहेरील रुघ्न हा पाकिस्तानातील नसून आपलाच कोणी नातलग असतो त्यासाठी नातेवाईक वाटेल त्या ठिकाणावरून इंजेक्शनची जुळवा जुळव करण्याचा प्रयत्न करत असतात त्यामुळे  जिल्ह्यबाहेरील खरेदी विक्री वर असलेली बंदी उठवावी अशी मागनी प्रशांत पाटील यांनी केली आहे,

Leave A Reply

Your email address will not be published.