भुसावळात दरोडेखोरांची टोळी बाजारपेठ पोलिसांच्या जाळ्यात

0

भुसावळ (प्रतिनिधी)- भुसावळ राष्ट्रीय महामार्ग  क्रमांक ६ वरील वांजोळा रोड फाट्याजवळ रस्त्याच्या बाजूला खडीच्या मोठ्या ढिगाच्या आडोशाला चोरी , घरफोडी तसेच दरोडा टाकण्याच्या उद्देशाने दबा धरुन लपलेल्या दरोडेखोरांचे  टोळीस बाजारपेठ पोलिसांनी पकडले असून यातील तीन दरोडेखोर  पोलिसांच्या हाती लागले असून यातील  दोन आरोपी फरार झाले आहे.

या प्रकरणी फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत नीळकंठ सोनार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलिस स्टेशनला गुन्हयाची  नोंद करण्यात आली आहे. दिनांक 3 मे रोजी 11.30 वाजेच्या सुमारास  शहरात नॅशनल हायवे क्रमांक ६ वरील वांजोळा फाटा येथे रस्त्याच्या बाजूला खडीच्या मोठ्या ढिगाच्या मागे चोरी व घरफोड्यांच्या उद्देशाने दबा धरून असलेले आरोपी  असे एकत्र येऊन घातक शस्त्र बाळगून दरोडा घालण्याची पूर्वतयारी करीत असतांना बाजारपेठ पोलिसांना आढळले .असता त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले . यावेळी तिघाना पकडले तर दोघे फरार झाले. 

सदर दरोडेखोर आरोपी आनंद विजय सारवान, जितेंद्र किसन गोडाले, नितीन जगदीश पथरोड,गोपी धामणे पूर्ण नाव माहीत नाही,आकाश पारधे पूर्ण नाव माहीत नाही अशी यांची नावे आहेत. 

चोरी व घरफोड्यांच्या उद्देशाने दबा धरून असलेले आरोपी  असे एकत्र येऊन घातक शस्त्र बाळगून दरोडा घालण्याची पूर्वतयारी करीत असतांना बाजारपेठ पोलिसांना आढळले तसेच  जिल्हाधिकारी यांच्या जमाव बंदी व संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करतांना मिळून आले म्हणून उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली  बाजारपेठ पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या आदेशान्वये कलम 399, 402 आर्म ॲक्ट सह 4/25 मुंबई पोलीस अधिनियम व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 (ब)प्रमाणे कायदेशीर नोंद करण्यात आली आहे. 

गुन्ह्यातील तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून दोन आरोपी फरार झाले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि हरीश भोये करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.