साकेगाव रस्ता लूट प्रकरणातील तिसरा आरोपी जेरबंद

0

भुसावळ :  भाजीपाला घेण्यासाठी निघालेल्या साकेगावच्या शेतकर्‍याला मारहाण करीत लूटण्यात आल्याची घटना महामार्गावर घडली होती. या प्रकरणी सुरूवातीला गुन्हे शाखेने आदर्श बाळू तायडे उर्फ डफली याला तर दुसरा पसार आरोपी यांना अमोल राजेंद्र चौधरी यास तालुका पोलिसांनी अटक केली होती. या गुन्ह्यातील तिसरा आरोपी सोनू रामेश्‍वर पांडे (28, जुना सातारा, भुसावळ) यास सोमवार, 3 रोजी घोडेपीर बाबा दर्गा परीसरातून अटक करण्यात आली.

दरम्यान, या गुन्ह्यात काही आरोपींचा सहभाग दिसून आल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

तालुक्यातील साकेगाव येथील विनोद बजरंग परदेशी (रा.साकेगाव) हे किराणा व्यावसायीक तसेच शेतकरी सोमवार, 19 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता ते दुचाकीने साकेगाव शिवारातील महामार्गालगतच्या शेतात भाजीपाला आणण्यासाठी निघाले असता सिनेस्टाईल दूचाकीने आलेल्या तिघा आरोपींनी त्यांना मारहाण करीत लुटले होते. पोलिसांनी या प्रकरणी आदर्श बाळू तायडे उर्फ डफली (चांदमारी माळ, भुसावळ) व अमोल चौधरी (रा.साकेगाव) यांना अटक करीत सोन्याचे दागिणे, दुचाकी (एम.एच.19 डी.आर.5042) ज्युपीटर गाडी व दोन हजार रुपये रोख, मोबाईल आदी मुद्देमाल हस्तगत केला होता तर तिसरा आरोपी सोनू रामेश्‍वर पांडे हा पसार झाला होता. आरोपी सोमवारी दुपारी घोडेपीर बाबा परीसरात असल्याची माहिती मिळताच त्यास अटक करण्यात आली.

जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सहा.पोलिस निरीक्षक अमोल पवार, कॉन्स्टेबल अविनाश टहाकळे, युनूस शेख, चालक मोनी पाटील आदींनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.