खामगाव न.प. मुख्याधिकारी अकोटकर लयंभारी ; बुलढाणा जिल्हा नगर विकास शाखेचेही कारभारी

0

खामगाव (गणेश भेरडे)- सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या अधिकार्‍याने केवळ समाजहिताच्या दृष्टीने सरकारी सेवा इमाने इतबारे करावी, ना की ओरबडण्याची भूमिका घ्यावी अशी प्रशासनासह सर्वसामान्य जनतेचीही अपेक्षा असते. मात्र येथे न.प. मुख्याधिकारी म्हणून रूजू झालेले मनोहरराव अकोटकार लयंभारी निघाले आहे.

त्यांनी येथे रूजू होताच मागील मुख्याधिकार्‍यांनी खरकटे ठेवलेले भांडे घासून फार मोठी खुरचन खाल्ली असल्याचे ठेकेदार बोलत आहेत. दरम्यान हेच महाशय कर्मधर्म संयोगाने म्हणा की, योगायोगाने म्हणा जिल्हाधिकारी कार्यालयातील नगर विकास शाखेचे अधिकारी म्हणून पदभार सांभाळत आहेत. त्यामुळे खामगाव नगर परिषदेतील विकास कामाबाबत कोण्या ठेकेदाराची तक्रार झाली असल्यास त्या तक्रारीचे निवारण करण्यात येत नाही आणि संबंधिताने जिल्हाधिकारी कार्यालयास तक्रार केल्यास सदर तक्रार जिल्हा नगर विकास शाखेकडे वर्ग केली जाते. तेथे अकोटकर महाशय जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांचा ठेका घेऊन बसलेले असतांना जिल्ह्यातील इतर वरिष्ठ महसूल अधिकार्‍यांची बिशाद काय? पण मुख्याधिकारी म्हणून अकोटकार यांचा मुळ पदभार असलेल्या खामगाव नगर पालिकेच्या काही ठेकेदारांना मात्र अभय मिळाले असल्याचे बोलले जात आहे.

वास्तविक पाहता त्यांच्याकडे  खामगाव न. प. मुख्याधिकारी पदभार असतांना ते या नगर पालिकेच्या तक्रारीवर निर्णय देऊन प्रकरण नस्ती करू शकत नाही, मात्र ही किमयासुध्दा ते करीत आहेत, अशा अधिकार्‍याची मुळासकट चौकशी करणे क्रमप्राप्त ठरत असून जिल्हाधिकारी यांनी याकडे लक्ष द्यावयास पाहिजे. तरच जिल्ह्यासह खामगाव नगर पालिकेतील भ्रष्टाचार प्रकरणे चव्हाट्यावर येतील, तर अशा स्थितीत जिल्हाधिकारी यांनी स्वत किंवा अन्य नगर परिषदेच्या माध्य माध्यमातून खामगाव न.प. मधील भ्रष्टाचाराच्या तक्रारींची चौकशी करणे गरजेचे आहे.मग ते नटराज गार्डन प्रकरण असो वा अन्य, पण तत्पुर्वी जिल्हा नगर विकास शाखेतून ठेकेदारांचे तारणहार मनोहरराव अकोटकार यांना हटविण्याची गरज आहे. याकडे जिल्हाधिकारी, पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे तसेच महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या अधिकार्‍याला त्याची जागा दाखवून द्यावी, अशी मागणी लाभार्थी ठेकेदार वगळता इतरांकडून होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.