जळगावात हातात तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्याला अटक

0

जळगाव प्रतिनिधी  | रामेश्वर कॉलनी परिसरातील सिद्धार्थनगरात हातात तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या तरूणास रविवारी रात्री एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून तलवार हस्तगत करण्यात आली.

लखन समाधान सपकाळे (वय २६, रा. सिद्धार्थनगर, रामेश्वर कॉलनी) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. रविवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास रामेश्वर कॉलनीतील सिद्धार्थनगरात असलेल्या बांधाजवळ लखन हा हातात तलवार घेऊन दहशत माजवत करत असल्याची माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रतापसिंह शिकारे यांना मिळाली. त्यानुसार पाेलिसांच्या पथकाने त्याला अटक केली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.