खुशखबर ! सोने-चांदी १२०० रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याचा भाव

0

नवी दिल्लीः आज सोने-चांदीच्या भावात घसरण झाल्याच पाहायला मिळाल आहे. सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 191 रुपयांनी स्वस्त झालंय, तर चांदीत प्रतिकिलो 1062 रुपयांनी घसरण झालीय. घसरणीनंतर दिल्ली बुलियन मार्केटमध्ये आज सोन्याचा बंद भाव प्रति दहा ग्रॅम 46283 रुपये आणि चांदी 67795 रुपये प्रतिकिलो होती. मागील व्यापार सत्रात सोन्याचे दर दहा ग्रॅम 46474 रुपये आणि चांदी 68857 रुपये प्रति किलोच्या पातळीवर बंद झाली होती.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याच्या दरात किंचित वाढ दिसून येत आहे. जून डिलीव्हरीसाठी सोन्याचा भाव 3.55 डॉलरच्या तेजीसह 1771.85 डॉलरवर होता. यावेळी चांदीचा दर प्रति औंस पातळीवर 25.98 डॉलरवर होता. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत रिकव्हरी वेगाने होत आहे, ज्यामुळे सोन्याच्या किमतींवर दबाव वाढत आहे.

सोन्याचा भाव : 

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर शुक्रवारी जून वायदा सोन्याचा भाव 57 रुपयांनी घसरून 46,669 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली. गेल्या व्यापार सत्रात सोन्याचे दर 0.75 टक्क्यांनी घसरले होते. ऑगस्ट 2020 मधील विक्रमी दर 56,200 प्रति 10 ग्रॅम रुपयांपेक्षाही 10,000 रुपये कमीच आहे.

चांदीचा भाव :

एमसीएक्सवरील मे वायदा चांदीचा दर 70 रुपयांनी वाढून 67,544  रुपये प्रतिकिलोवर व्यापार करत आहे. मागील सत्रात चांदीच्या दरांत -0.6 टक्क्यांनी घसरले होते. 2020 मध्ये यूएस ट्रेझरी बाँड यील्ड्समध्ये वाढ झाल्यामुळे, सोन्याने चमक काहीशी कमी झाली होती. यावर्षीही सोन्याच्या किंमतीवर दबाव दिसत आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याची किंमत 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅम  तर, चांदी 80,000 रुपये प्रति किलो अर्थात सर्वात उच्चांकावर होती.

Leave A Reply

Your email address will not be published.