पिंप्रीहाट येथे जन्ना मन्ना अड्यावर पोलिसांचा छापा ; १ लाख ६५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत

0

भडगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील पिंप्रीहाट येथे दि ३० रोजी रात्री १:४५ वाजेच्या सुमारास बात्सर रस्त्या लगत ज्ञानेश्वर बाबूलाल पाटील यांच्या गुरांच्या शेतात नऊ वाहनधारक हे गैर कायदा जन्ना मन्ना नावाचा पत्ता जुगार खेळताना व खेळविताना पोलिसांच्या छाप्यात आढळून आले. शेतात पोलीस पोहचे पर्यंत सुगावा लागल्याने जुगरखोरांनी पळ काढला या धाडीत ३०० रुपये रोख रकमेसह ९ मोटारसायकल पोलिसांनी ताब्यात घेतल्या असून या बाबत भडगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की, पोलीस निरीक्षक अशोक उतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांना मिळालेल्या गुप्त महितिच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे, पोलीस नाईक नितीन सोनवणे, पोलीस कॉ. स्वप्नील पाटील, ईश्वर पाटील यांच्या पथकाने ही कार्यवाही केली.

घटनास्थळून २० हजार रुपये किमतीची होंडा कँपनी लाल काळ्या रंगाची शाईन  क्र. एम एच १५- डीपी ९४१ ,

१८ हजार किंमतीची हिरो कँपनी ची एच एफ डीलक्स क्र. एम एच १९- बी व्ही ६४८१,

२० हजार किंमतीची हिरो एच एफ डीलक्स एम एच १९ डीएम ११९३,

१५ हजार किंमतीची टिव्हीइस मॅक्स – एम एच १९ – बीएफ २८५२,

२० किंमतीची हिरो एच एफ डीलक्स एम एच १९,डीएम-११०१,

१२ हजार किमतीची विना नंम्बर हिरोहोंडा फॅशन प्लस,

१५ किंमतीची टिव्हीएस स्टार सिटी एमएच १९- एडब्ल्यू ३३८१,

२५ हजार किंमतीची होंडा शाईन एम एच १९- बी वाय- ८१३८,

२० हजार किंमतीची हिरो एच एफ डीलक्स एम एच १९ बिडी ६३७९,

एक-एक १०० व २०० रुपयांच्या चलनी नोटा असे ३०० रुपये रोख, पत्त्यांचा कॅट, प्लास्टिक गोणी फट , असा एकूण १,६५,३०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला  आहे. याबाबत जुगार खेळणारे पळून गेलेले वाहनधारक १ ते ९ यांच्या विरुद्ध पोलीस नाईक नितीन सोनवणे यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२(अ) प्रमाणे तसेच भारत देशात कोरोना आजाराने थैमान घातलेले असतांना जिल्हाधिकारी जळगाव यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १४४ अन्वय संचारबंदी व जमावबंदी चे आदेश काढलेले असतांना सदर आदेशाचे उल्लंघन करून भादवी कलम १८८ ,२६९, २७० सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)(३)चे उल्लंघन कलम १३५ प्रमाणे फिर्याद दाखल करण्यात आली असून या गुन्हाचा तपास पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे हे करीत आहेत .

Leave A Reply

Your email address will not be published.