मे महिन्यात तब्बल १२ दिवस बँकांना सुट्ट्या ; जाणून घ्या तारखा

0

मुंबई : उद्या शनिवारपासून सुरु होणाऱ्या मे महिन्यात तब्बल १२ दिवस बँका बंद राहणार आहेत. यात पाच दिवस सार्वजनिक सुट्ट्यांचे असून उर्वरित शनिवार आणि रविवार आहेत.त्यामुळे गैरसोय होऊ नये, म्हणून ग्राहकांनी बँक हॉलिडे नेमके कधी आहेत याची महिती घ्यायला हवी.

उद्या शनिवारी १ मे रोजी कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन यानिमित्त सार्वजनिक सुट्टी आहे. तर २ मे रोजी रविवार असल्याने बँका बंद असतील. ८ मे रोजी दुसरा शनिवार आणि ९ मे रोजी रविवार असल्याने सलग दोन दिवस बँका बंद राहतील.

दरम्यान, ७ मे रोजी जुमात ए विदाची जम्मू आणि श्रीनगर या परिक्षेत्रातील बँकांना सुट्टी असेल असे आरबीआयने म्हटलं आहे. १३ मे रोजी रमजान ईदची सार्वजनिक सुट्टी आहे. १४ मे रोजी अक्षय्य तृतीया , भगवान परशुराम जयंती , ईद उल फित्र निमित्त सार्वजनिक सुट्टी राहील. १६ मे रोजी रविवार असल्याने बँका बंद असतील.

२२ आणि २३ मे रोजी चौथा शनिवार आणि रविवार असल्याने सलग दोन दिवस बँका बंद राहतील. २६ मे रोजी बुद्ध पौर्णिमा निमित्त सार्वजनिक सुट्टी असल्याने बँका बंद राहतील. तर मे महिन्यात शेवटचा रविवार ३० मे रोजी असून या दिवशी बँका बंद राहतील.

 

Leave A Reply

Your email address will not be published.