खौलखेड येथील काॅंग्रेसच्या रक्तदान षिबीराला उत्स्फुर्त प्रतिसाद ; औचित्य सानंदांच्या वाढदिवसाचे

0

खामगांव(प्रतिनिधी) सध्या राज्यातील रक्तपेढयामध्ये असलेल्या रक्ताचा तुटवडा दूर करण्यासाठी प्रदेश काॅंग्रेस कमिटीच्या आवाहनानुसार मा.आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या मार्गदर्षनाखाली खामगांव मतदार संघातील काॅंग्रेसजणांच्या वतीने महारक्तदान शिबीर आयोजित करुन 500 बाॅटल रक्तदान करण्याचा संकल्प हाती घेण्यात आला आहे.दि.14 एप्रिल ते 1 मे मा.आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांचा वाढदिवस या  पंधरवाडयापर्यंत हे  महारक्तदान शिबीराचे आयोजित करण्यात आले असुन या रक्तदान शिबीराला कोरोना काळातही ठिक-ठिकाणी ग्रामस्थांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.

दि.29 एप्रिल रोजी चैथ्या टप्प्यात खौलखेड दौंदवाडा या ग्राम पंचायतच्या वतीने खौलखेड येथे रक्तदान शिबीर  आयोजित करण्यता आले होते. या कार्यक्रमाला माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा,तालुका काॅंग्रेस कमिटीचे अध्यक्ष डाॅ.सदानंद धनोकार,नगरसेवक किशोरआप्पा भोसले,अनंता धामोळे, सचिन जैस्वाल,खौलखेडचे सरपंच उज्वलाबाई आवार,उपसरपंच गजाननसिंग राजपुत,किशोर राजपुत, जितेंद्र खंडेराव,चंदनसिंग राजपुत आदींची प्रमुख उपस्थिती होती.

खौलखेड येथील ग्राम पंचायत कार्यालय येथे झालेल्या रक्तदान शिबीरामध्ये कु.भारती दिलीपसिंग राजपुत हिच्यासह चंदनसिंग राजपुत, जितेंद्रसिंग  विठठ्लसिंग राजपुत, सुरेंद्रसिंग राजपुत, विक्की चव्हाण, गजाननसिंग राजपुत, जितेंद्र उदयसिंग राजपुत, सुमितसिंग राजपुत, संतोश जवकार, अमोल राजपुत,शिवाजी जवकार,उमेश डाबेबराव,विरेंद्रसिंग राजपुत, राहुल पहुरकर, गोपाल राजपुत, गणेश जमेवार, राहुल उमाळे, करण मोरे, राहुल वरखेडे, पवन राजपुत, किशोरसिंग राजपुत यांनी स्वयंस्फुर्तीने  रक्तदान केले. याप्रसंगी रक्तदान करणा-या रक्तदात्यांचा माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या हस्ते गुलाब पुष्प देउन सत्कार करण्यात आला व लाडु भरवुन त्यांचे तोंड करण्यात आले. हे रक्तदान शिबीर यशस्वी करण्याकरीता सोनी पॅथाॅलाॅजी व ब्लड बॅंकचे डाॅक्टर व कर्मचारी वृंद यांचे सहकार्य लाभले.

सर्वप्रथम माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या हस्ते भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुध्द यांच्या पुतळयांना माल्यार्पण करुन रक्तदान कार्यक्रमाला शुभारंभ करण्यात आला. यावेळी रक्तदान सर्वश्रेश्ठ दान, रक्तदान महादान अश्या घोशणा देण्यात आल्या.

या कार्यक्रमाला ग्राम पंचायत सदस्य नानाराव खंडेराव,ग्रा.पं.सदस्या सौ.शारदा जितेंद्र खंडेराव, सौ.ज्योती प्रकाश जमेवार,सौ.रत्नाबाई दिलीपसिंग राजपुत,बाबुराव जवकार,सरदारसिंग राजपुत,धनसिंग राजपुत, राजेश राजपुत, अजयसिंग राजपुत, मंगलसिंग राजपुत, विरेंद्र राजपुत,किशोरसिंग राजपुत, शांताराम कुळसकार,सागर अवचार यांच्यासह  अमर संघ मित्र मंडळ खौलखेड व दौंदवाडा येथील काॅंग्रेसचे पदाधिकारी,ग्राम पंचायत सदस्य व काॅंग्रेस कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.कोरोनाच्या पाष्र्वभुमीवर शासनाने दिलेल्या सर्व नियमांचे पालन करुन सोशल डिस्टसिंग ठेउन हे  रक्तदान शिबीर पार पडले. शनिवार दि.1 मे 2021 रोजी कर्मयोध्दा माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या हस्ते खामगांव येथे भव्य महारक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.