अमळनेरात महसूल विभागाची “दबंग” कामगिरी

0

अमळनेर(प्रतिनिधी) : अमळनेर तालुक्यात पांझरा,तापी व बोरी नदी असल्यामुळे अवैध रेती वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते.त्यातच कोरोनाच्या काळात प्रशासकीय यंत्रणा व्यस्त असल्यामुळे वाळू वाहतूक काही प्रमाणात वाढलेली होती.मात्र आता प्रशासनाने मोहीम तीव्र केलेली आहे, यामुळे अमळनेर तालुक्यात रेती माफियांचे धाबे दणाणले आहे.

एकाच दिवसात रात्री ५ व सकाळी २ अशा एकूण ७  ट्रॅक्टर वर कार्यवाही करण्यात आली आहे.शहापूर,एकलहरे व अमळनेर शहरात अवैध रित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडण्यात आले आहेत.महसूल विभागाने एवढ्या मोठ्या प्रमाणात कार्यवाही केल्यामुळे तालुक्यात होणाऱ्या अवैध रेती वाहतुकीला लगाम लागणार आहे.

पथकात स्वतः तहसिलदार मिलिंदकुमार वाघ तसेच मडंळ अधिकारी पी.एस. पाटील नगाव बु,जी.आर. महाजन शहर तलाठि,आशिष पारधे तलाठी सारबेटे बु,स्वप्निल कुळकर्णी तलाठी ढेकु बु. उपस्थित होते. सदर ट्रॅक्टर्स मुद्देमालासह तहसिल कार्यालय अमळनेर येथील आवारात जमा करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.